शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

पॅरिस ऑलिम्पिकची रंगतदार सुरुवात; ४ तासांच्या सोहळ्यात सिंधू-अचंता यांनी केले भारताचे नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 08:15 IST

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चे भव्य उद्घाटन २६ जुलै रोजी झाले, तर ११ ऑगस्ट रोजी समारोप होणार आहे.

Paris Olympics Opening Ceremony: जगाचे लक्ष लागून राहिलेल्या २०२४ पॅरिस ऑलिम्पिक क्रीडोत्सावाला पॅरिस येथे सुरुवात झाली. नेहमीच्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या परंपरेला छेद देत पहिल्यांदाच स्टेडियमऐवजी नदीच्या पात्रात हा उद्घाटन सोहळा पार पडला. सुमारे चार तास पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा चालला. ९५ बोटींतून ६,५०० हून अधिक खेळाडूंनी यामध्ये भाग घेतला. भारताचे ध्वज वाहक पीव्ही सिंधू आणि अंचता शरत कमल होते. उद्घाटन समारंभात भारतीय दलातील ७८ खेळाडू सहभागी झाले होते. परेडमध्ये सहभागी झालेल्या देशांमध्ये भारत ८४ व्या क्रमांकावर होता.

शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमामुळे भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी उद्घाटन सोहळ्यात सहभाग घेतला नाही. ध्वजवाहक सिंधू आणि शरथ कमल व्यतिरिक्त, इतर महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये तिरंदाज दीपिका कुमारी, बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि टेनिसपटू रोहन बोपण्णा उद्घाटन समारंभात होते. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या उद्घाटन सोहळ्याने अधिकृतपणे सुरुवात झाली. फ्रान्सची सर्वात प्रसिद्ध ट्रॅक ॲथलीट मेरी-जोस पेरेक आणि तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती ज्युडोका टेडी रिनर यांनी शुक्रवारी पॅरिस ऑलिम्पिकची मशाल संयुक्तपणे प्रज्वलित केली.

ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा मैदानाबाहेर आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ होती. चार तास चाललेल्या या सोहळ्यात अनेक कलाकारांनी भाग घेतला. पॉप स्टार लेडी गागा, अया नाकामुका यांसारखे सुपरस्टार परफॉर्म करताना दिसले. त्याच वेळी, सहा किलोमीटर लांबीच्या परेड ऑफ नेशन्समध्ये २०६ देशांतील ६५०० हून अधिक खेळाडूंनी ९४ बोटींमध्ये भाग घेतला. 

पहिल्या दिवसाचे भारताचे वेळापत्रक

बॅडमिंटनसंध्याकाळी ७.१० वाजता - पुरुष एकेरी गट सामना: लक्ष्य सेन विरुद्ध केविन कॉर्डन (ग्वाटेमाला)रात्री ८ वाजता - पुरुष दुहेरी गट सामना: सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी विरुद्ध लुकास कॉर्वे आणि रोनन लाबर (फ्रान्स)रात्री ११:५० - महिला दुहेरी गट सामना: अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो विरुद्ध किम सो येओंग आणि काँग ही योंग (कोरिया)

बॉक्सिंगदुपारी १२:०५ - महिला ५४ किलो प्राथमिक फेरीचा सामना: प्रीती पवार विरुद्ध थी किम आन्ह वो (व्हिएतनाम)

हॉकीरात्री ९ वाजता- पूल ब सामना: भारत विरुद्ध न्यूझीलंड

नौकानयनदुपारी १२:३० - पुरुष एकेरी स्कल्स: पनवर बलराज

टेबल टेनिस७:१५ - पुरुष एकेरी पहिली फेरी: हरमीत देसाई विरुद्ध जैद अबो (येमेन)

टेनिस०३:३० - पुरुष दुहेरीची पहिली फेरी सामना: रोहन बोपण्णा आणि एन श्रीराम बालाजी विरुद्ध एडवर्ड रॉजर-व्हॅसेलिन आणि फॅबियन रेबोल (फ्रान्स)

शूटिंगदुपारी १२:३० - १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक पात्रता: संदीप सिंग / इलावेनिल वालारिवनदुपारी १२:३० - १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक पात्रता: अर्जुन बबुता / रमिता जिंदालदुपारी २ - १० मीटर एअर पिस्तूल पुरुष पात्रता: अर्जुन सिंग चीमादुपारी २ - १० मीटर एअर पिस्तूल पुरुष पात्रता: सरबज्योत सिंगदुपारी ४ - १० मीटर एअर पिस्तूल महिला पात्रता: मनू भाकरदुपारी ४ - १० मीटर एअर पिस्तूल महिला पात्रता: रिदम सांगवान 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४PV Sindhuपी. व्ही. सिंधूIndiaभारत