शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 12:46 IST

Myanmar Paraglider Bomb Attack: म्यानमारमध्ये एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने भीषण हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये २४ जणांचा मृत्यू झाला असून ४७ जण जखमी झाले.

Myanmar Paraglider Attackम्यानमारमध्ये एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने भीषण हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये २४ जणांचा मृत्यू झाला असून ४७ जण जखमी झाले. निर्वासित राष्ट्रीय एकता सरकारच्या प्रवक्त्याने बीबीसी बर्मीजला ही माहिती दिली. सोमवारी संध्याकाळी चौंग ऊ शहरात ही भयंकर घटना घडली, जिथे बौद्ध परंपरेशी संबंधित असलेल्या थाडिंग्युट उत्सव साजरा करण्यासाठी जवळपास १०० लोक जमले होते. या कार्यक्रमादरम्यान, काही जण सरकारी धोरणांविरुद्ध कँडल मार्चचं नेतृत्व करत असताना राग्लायडरमधून दोन बॉम्ब टाकण्यात आले.

२०२१ मध्ये लष्कराने सत्ता काबीज केल्यापासून म्यानमार गृहयुद्धात अडकला आहे. संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे की, हिंसाचारात ५,००० हून अधिक नागरिक मारले गेले आहेत. सोमवारी (६ ऑक्टोबर) पीपल्स डिफेन्स फोर्सेसच्या प्रतिनिधीने बीबीसी बर्मीजला सांगितलं की, ते लोक जमलेले असताना त्यांना हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर आंदोलन लवकर संपवण्याचे प्रयत्न सुरू होते, परंतु पॅराग्लायडर आधी आलं आणि अवघ्या सात मिनिटांत बॉम्ब टाकण्यात आले.

एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, "पहिला बॉम्ब माझ्या गुडघ्यावर लागला, पण मला माझ्या आजूबाजूला लोकांचा आवाज ऐकू येत होता." स्थानिकांनी सांगितलं की, हल्ल्यानंतर कोणाचा मृत्यू झाला हे ओळखणं कठीण होतं. आंदोलनाचं आयोजन करणाऱ्या एका महिलेने वृत्तसंस्थेला सांगितलं की, "लहान मुलं अत्यंत वाईट पद्धतीने जखमी झाली होती."

विमान आणि हेलिकॉप्टरच्या कमतरतेमुळे लष्कर पॅराग्लायडर हल्ल्यांचा वापर वाढवत असल्याचं म्हटलं जात आहे. आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे त्यांना नवीन शस्त्रे आणि विमानं खरेदी करण्यापासूनही रोखलं गेलं आहे. निषेधादरम्यान, लोक लष्कराच्या सक्तीच्या भरती धोरणांचा आणि आगामी निवडणुकांचा निषेध करत होते आणि आंग सान सू की यांच्यासह राजकीय कैद्यांच्या सुटकेची मागणी करत होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Paraglider bomb attack at Myanmar religious event kills 24, injures 47.

Web Summary : A paraglider bomb attack during a religious festival in Myanmar killed 24 and injured 47. The incident occurred in Chaung U, where people were protesting military policies and demanding the release of political prisoners. The military is reportedly increasing paraglider attacks due to aircraft shortages.
टॅग्स :Myanmarम्यानमारBombsस्फोटकेDeathमृत्यू