शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

संपूर्ण जगातील मुस्लिमांना खास ‘गिफ्ट’ देण्याच्या प्रयत्नात चीन! जे कुणालाही जमलं नाही ते ड्रॅगन करणार? असं आहे मिशन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 16:06 IST

...याचाच एक भाग म्हणून चीन पॅलेस्टाइनसोबत चर्चा करत आहे आणि पॅलेस्टाइनही चीनच्या प्रयत्नांचा खुल्या मनाने स्वीकार करत आहे. पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती महमूद अब्बास सध्या तीन दिवसीय चीन दौऱ्यावर आहेत.

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. या संघर्षाचे मूळ आहे अल-अक्सा मशीद. हे जेरुसलेममधील एक धार्मिक स्थळ आहे. हे जगभरातील मुस्लिमांचे श्रद्धा स्थान आहे. तर दुसरीकडे, ज्यूंसाठी हे त्यांच्या अस्तित्वाचे सर्वात मोठे प्रतीक. या जागेवरून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यो दोन्ही देशांमध्ये जुना वाद आहे. हा तणाव संपविण्यासाठी अमेरिकेसह जगातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. मात्र आजतागायत येथे शांतता प्रस्थापित झालेली नाही. आता चीन या दिशेनं पावलं टाकणार आहे.

याचाच एक भाग म्हणून चीनपॅलेस्टाइनसोबत चर्चा करत आहे आणि पॅलेस्टाइनही चीनच्या प्रयत्नांचा खुल्या मनाने स्वीकार करत आहे. पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती महमूद अब्बास सध्या तीन दिवसीय चीन दौऱ्यावर आहेत. ते 13 जून रोजी येथे पोहोचले आहेत. त्यांचा हा पाचवा चीन दौरा आहे.

या दौऱ्यात महमूद अब्बास हे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना भेटून पॅलेस्टाईनसंदर्भातील क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील. याशिवाय ते चीनचे पंतप्रधान ली कियांग यांचीही भेट घेणार आहेत. महमूद अब्बास यांच्या दौऱ्यापूर्वीच चीनने त्यांना आपला जुना मित्र असल्याचे म्हटले होते. एवढेच नाही, तर पॅलेस्टानच्या नागरिकांच्या अधिकारांसाठी चीन नेहमीच त्यांचे समर्थन करत असतो, असेही चीनने म्हटले आहे.

चीनच्या पाठिंब्यामागचे राजकारण?चीनची संपूर्ण जगात एक अविश्वासू देश म्हणून ओळख आहे.  त्यांच्या विस्तारवादी धोरणाला भारतही कंटाळला आहे. याच बरोबर त्याने आर्थिक आघाडीवरही जगाचे नेतृत्व करायला सुरुवात केली आहे. आता जागतिक पुढारी होण्यात चीनसमोर सर्वात मोठे आव्हान हे जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे आहे. यामुळे अमेरिकेला साइड लाइन करण्यासाठी चीन अशा पद्धतीची पावले उचलत असल्याचे मानले जात आहे.

खाडी देशांसाठी अल अक्सा मशी आणि पॅलेस्टाईनची शांतता नेहमीच एक मोठा मुद्दा राहिला आहे. यातच चीनने संपूर्ण जगातील मुस्लिमांची नजर असलेल्या पॅलेस्टाइन हा आंतरराष्ट्रीय मुद्दा उचलला आहे. अशा प्रकारचा प्रयत्न करून चीन अरब देशांवरील आपली पकड मजबूत करून, पश्चिमेसमोर आणखी शक्तीशाली राष्ट्र म्हणऊन स्वतःला उभे करू इच्छित आहे.

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील शेवटची चर्चा 2014 मध्ये झाली होती. ही चर्चा म्हणजे, अमेरिकेच्या प्रयत्नांची फलश्रृती होती.  आता चीन हा प्रयत्न करत आह. अशा स्थितीत चीनचे प्रयत्न इस्रायल-पॅलेस्टाईनमधील तणाव दूर करू शकतील का? हे पाहावे लागेल.

टॅग्स :chinaचीनPalestineपॅलेस्टाइनIsraelइस्रायलMuslimमुस्लीम