पाकिस्तानची अंतराळ संस्था इस्रोसमोर कमकुवत, चीनच्या मदतीने पहिला स्वदेशी उपग्रह पाठवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 21:25 IST2025-01-17T21:23:30+5:302025-01-17T21:25:32+5:30
पाकिस्तानची अंतराळ संस्था SUPARCO ने काही दिवसापूर्वी चीनमधील जिउक्वान उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून त्यांचा पहिला स्वदेशी इलेक्ट्रो-ऑप्टिकल उपग्रह प्रक्षेपित केला.

पाकिस्तानची अंतराळ संस्था इस्रोसमोर कमकुवत, चीनच्या मदतीने पहिला स्वदेशी उपग्रह पाठवला
पाकिस्तानची अंतराळ संस्था स्पेस अँड अप्पर अॅटमॉस्फीअर रिसर्च कमिशनने अलीकडेच चीनमधील जिउक्वान उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून त्यांचा पहिला स्वदेशी इलेक्ट्रो-ऑप्टिकल उपग्रह प्रक्षेपित केला. हा उपग्रह पाकिस्तानला नैसर्गिक संसाधनांचे निरीक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि शहरी नियोजनात मदत करेल. या यशामागे चीनची महत्त्वाची भूमिका आहे, त्यांनी आपल्या लॉन्ग मार्च-२डी रॉकेटने हा उपग्रह अवकाशात पाठवला.
'सरकार उलथवण्याच्या उद्देशानेच केला गेला हल्ला'; भारतीय वंशाच्या तरुणाला अमेरिकत तुरुंगवासाची शिक्षा
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने आपल्या यशाचे वर्णन स्वावलंबन आणि तांत्रिक उत्कृष्टतेच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून केले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) ने १९६९ मध्ये स्थापनेपासून स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक दर्जाची अंतराळ संस्था म्हणून स्वतःची स्थापना केली आहे, परंतु पाकिस्तान आजही चीनवर अवलंबून आहे.
भारताने १९७५ मध्ये आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट प्रक्षेपित केला होता, तर आज स्वतःच्या प्रक्षेपण वाहने आणि तांत्रिक कौशल्याच्या माध्यमातून चंद्र आणि मंगळावरील मोहिमा यशस्वीरित्या पार पाडत आहे. तर १९४७ मध्ये भारतासोबत स्वातंत्र्य मिळवणारा पाकिस्तान अजूनही चीनच्या मदतीने अवकाशात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
मर्यादित संसाधने असूनही इस्रोने अवकाशात केलेल्या कामगिरीचे जागतिक स्तरावर कौतुक होत आहे. चांद्रयान आणि मंगळयान सारख्या मोहिमा इस्रोच्या स्वदेशी क्षमता आणि विज्ञानातील स्वावलंबनाचे प्रदर्शन करतात. याउलट, सुपरकोची प्रगती मंद आणि बाह्य मदतीवर अवलंबून आहे. पाकिस्तानकडे ना स्वतःचे रॉकेट आहेत ना पुरेसे तांत्रिक कौशल्य. प्रत्येक वेळी त्याला चीनसारख्या देशांकडून मदतीची आवश्यकता असते. SUPARCO ची कामगिरी पाकिस्तानसाठी अभिमानाची असू शकते, पण त्याची तुलना ISRO सोबत होऊ शकत नाही.