शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:47 IST

...अशा एकूण परिस्थितीत पाकिस्तानला एक वेगळीच भीती वाटू लागली आहे. इराणनंतर, पुढचा नंबर पाकिस्तानचा लागू शकतो, असे पाकिस्तानातील लोकांना वाटू लागले आहे.

संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेले इस्रायल-इराण युद्ध सहाव्या दिवशीही सुरूच आहे. इस्रायलनेइराणची राजधानी असलेल्या तेहरानवर जबरदस्त बॉम्बिंग केली आहे. याचवेळी, इराणने इस्रायलच्या तेल अवीव आणि इतर शहरांवर क्षेपणास्त्र डागली. दरम्यान, अमेरिका लवकरच या युद्धात भाग घेऊ शकते, असे वृत्त आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याला बिनशर्त शरणागतीची धमकी दिली आहे. इराणला अणुबॉम्ब मिळवू देणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अशा एकूण परिस्थितीत पाकिस्तानला एक वेगळीच भीती वाटू लागली आहे. इराणनंतर, पुढचा नंबर पाकिस्तानचा लागू शकतो, असे पाकिस्तानातील लोकांना वाटू लागले आहे.

पाकिस्तानसाठी धोका वाढला -पाकिस्तानी पत्रकार सईद काझी एका कार्यक्रमात म्हणाले, "अमेरिका इराणमध्ये बंकर बस्टर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. इराणचा अणुकार्यक्रम संपवल्यानंतर इस्रायल थांबेल, अशा भ्रमात पाकिस्तानने कदापी राहू नये. पाकिस्तानने आतापासूनच याला विरोध करायला हवा की, इराणमध्ये बंकर बस्टर बॉम्बचा वापर केल्यास आपण गप्प बसणार नाही." याशिवाय, इस्रायलचा इराणवरील हल्ला पाकिस्तानसाठी धोकादायक आहे. तसेच हे युद्ध जिंकल्यानंतर, इस्रायल थेट पाकिस्तानच्या सीमेपर्यंत पोहोचेल, असे सईद काझी यांनी म्हटले आहे.

ब्रिगेडियर हरिस नवाज (निवृत्त) यांनी आरोप केला आहे की, इस्रायलच्या इराणमधील यशात भारतीय गुप्तचर संस्था रॉचा मोठा हात आहे. चाबहारमध्ये बसून रॉने इस्रायली गुप्तचर संस्था मोसादला इराणमध्ये लिंक केले आणि तिला मोठा एक्सेस दिला. यानंतर, आता मोसाद इराणमध्ये आपल्या मानाप्रमाणे कारवाया चालवत आहे आणि वरिष्ठ कमांडर्सना संपवत आहे.

एक चूक इराणला पडू शकते भारी -माजी पाकिस्तानी लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हरिस नवाज यांनी त्याच कार्यक्रमात म्हटले आहे की, इराणसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, त्याने अमेरिका अथवा इतर कोणत्याही पाश्चात्य देशाच्या तळांवर हल्ला करू नये. जर इराणने असे केले, तर ती एक मोठी चूक असेल, कारण इस्रायलला हेच हवे आहे. तेहरानने असे करताच अमेरिका या युद्धात उडी घेईल आणि नंतर इस्रायल-अमेरिका दोघे मिळून इराणमध्ये हाहाकार माजवतील.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIsraelइस्रायलIranइराणAmericaअमेरिकाwarयुद्ध