पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 09:10 IST2025-04-26T09:08:28+5:302025-04-26T09:10:38+5:30
पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया थांबवत नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, २४ तासांत नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्याची ही दुसरी वेळ आहे.

पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने सीमेवर गस्त वाढवली आहे. भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने अधिक सैन्याची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर गोळीबार केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५-२६ एप्रिल २०२५ च्या रात्री, काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या विविध चौक्यांवर विनाकारण गोळीबार करण्यात आला. भारतीय जवानांनीही याला प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला लष्कराने योग्य उत्तर दिल्याचे शनिवारी एका संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले. श्रीनगरमधील संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, २५-२६ एप्रिलच्या रात्री काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर अनेक पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवरुन गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या या कृतीला भारतीय लष्कराच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.
भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले
शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेच्या काही भागात पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. भारतीय सैन्याच्या शूर सैनिकांनी याला चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीतही कोणतीही जीवितहानी झाली नाही. पाकिस्तानी गोळीबार आणि त्याला भारताने दिलेल्या प्रत्युत्तराबाबत भारतीय लष्कराकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
गेल्या शुक्रवारी, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी वरिष्ठ लष्करी कमांडर्ससोबत श्रीनगरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
गेल्या शुक्रवारी, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी वरिष्ठ लष्करी कमांडर्ससोबत श्रीनगरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.