शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 15:17 IST

इराण-इस्त्रायल युद्धातही पाकिस्तान भारताविरोधात संधी शोधण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्याच्या या प्रयत्नाने इस्त्रायलला त्याचा शत्रू बनवले आहे.

इराण-इस्त्रायल यांच्या युद्धात पाकिस्तान विनाकारण नाक खुपसण्याचा प्रयत्न करत आहे. सातत्याने पाकिस्तानकडूनइराणच्या समर्थनार्थ विधाने येत आहेत. त्यातच असं काय झाले ज्यामुळे पाकिस्तान पूर्णपणे बॅकफूटवर आला आहे. इस्त्रायलसोबत यु्द्धात पाकिस्तानकडून नेतन्याहू यांच्या देशावर अणूहल्ला होऊ शकतो असा दावा इराणकडून आला. मात्र इराणच्या या दाव्यामुळे पाकिस्तानची बोबडीच वळली. भारत आणि इस्त्रायल यांचे खूप चांगले संबंध आहेत हे पाकिस्तानला चांगलेच माहिती आहे. मात्र पाकिस्तान त्यांची नापाक कृत्ये सोडत नाही. इराण-इस्त्रायल युद्धातही पाकिस्तान भारताविरोधात संधी शोधण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्याच्या या प्रयत्नाने इस्त्रायलला त्याचा शत्रू बनवले आहे.

पाकिस्तानची झाली फजिती

इराणसोबत युद्धावेळीच पाकिस्तानने इस्त्रायलवर अणूहल्ला करण्याची धमकी देण्याची बातमी फेटाळून लावली आहे. आम्ही कधीही इस्त्रायलला अणूहल्ल्याची धमकी दिली नाही असं पाकिस्तानने म्हटले. पाकिस्तानकडून हे स्पष्टीकरण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या इराणच्या सैन्य अधिकारी जनरल मोहसेन रेजाई यांच्या विधानावर आले. रेजाई यांनी म्हटलं होते की, जर इस्त्रायलने इराणवर अणूहल्ला केला तर पाकिस्तान इस्त्रायलवर अण्वुबॉम्ब टाकेल. 

पाकिस्तानने अण्वस्त्र चाचणीवेळी त्यांच्या न्यूक्लियर बॉम्बला इस्लामिक अण्वस्त्र म्हटले होते. हे बोलून पाकिस्तान स्वत:ची इस्लामिक देशांमध्ये वजन वाढवण्याचा प्रयत्न करत होता. परंतु इस्त्रायलने पाकिस्तानच्या अणूबॉम्बची हवाच काढली. इस्त्रायल भलेही इराणवर हवाई हल्ले करत असेल परंतु पाकिस्तानी सैन्य तणावात आले आहे. इराणनंतर आपलाच नंबर असेल अशी भीती पाकिस्तानला का वाटतेय हा प्रश्न आहे. इस्त्रायलने ज्यारितीने इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांना टार्गेट केले तसे पाकिस्तानला त्यांच्या न्यूक्यिलर ठिकाणांची भीती वाटते. भारताने पाकिस्तानवर जे ड्रोन हल्ले केले ते इस्त्रायली ड्रोनद्वारे केल्याचे पाकिस्तानी संसदेत सांगितले गेले. 

नेतन्याहूच्या शपथेला पाकिस्तान घाबरते

इस्त्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी खूप वर्षाआधी एक शपथ घेतली होती, इराण आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना उद्ध्वस्त करू. नेतन्याहू म्हणाले होते की, आमचे सर्वात मोठे मिशन आक्रमकवादी इस्लामी शासनाला अण्वस्त्रे मिळण्यापासून रोखणे हे आहे. अण्वस्त्रे दहशतवादी शासनाच्या हाती लागता कामा नये. मग ते इराण असो वा पाकिस्तान..या कट्टरपंथी देशांजवळ जर अण्वस्त्रे गेली तर याच्याशी निगडित जे काही नियम आहेत त्याचे पालन होणार नाही अशी भीती इस्त्रायलने व्यक्त केली होती. ही गोष्ट जरी जुनी असली तरी ज्यारितीने इस्त्रायलने इराणच्या अण्वस्त्रांच्या ठिकाणी हल्ला केला तसेच पाकिस्तानी अण्वस्त्रे ठिकाणे उद्ध्वस्त होऊ शकतात का हा प्रश्न आहे. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलPakistanपाकिस्तानIndiaभारत