शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
'५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार'; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
4
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
5
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव
6
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
7
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
8
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
9
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
10
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
11
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
12
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
13
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
14
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
15
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
16
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
17
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
18
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
19
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
20
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...

पाकिस्तानच्या गृहमंत्रालयानं हाफीज सईदच्या पक्षावर बंदी घालण्याची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 9:03 PM

पाकिस्तानच्या गृहमंत्रालयानं निवडणूक आयोगाकडे हाफिज सईद याच्या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या गृहमंत्रालयानं निवडणूक आयोगाकडे हाफिज सईद याच्या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 2008मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याच्या डोक्यावर अमेरिकेनं 1 कोटी अमेरिकी डॉलरच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.22 सप्टेंबरला पाकिस्तानच्या गृहमंत्रालयानं निवडणूक आयोगाकडे लष्कर ए तोय्यबाशी संबंधित नव्या स्थापलेला राजकीय पक्ष मिल्ली मुस्लिम लीगला अधिकृतरीत्या पक्ष म्हणून मान्यता न देण्याची मागणी केली आहे. लष्कर-ए-तोय्यबानं 2008मध्ये मुंबई दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. त्या हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला होता. दोन पानांच्या पत्रात गृहमंत्रालयानं लिहिलं आहे की, मिल्ली मुस्लिम लीगच्या रजिस्ट्रेशनचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्यांनी पाकिस्तान गृहमंत्रालयाकडून अशा आशयाचं पत्र मिळाल्याचं उघड केलं आहे.जमात- उद- दावाचा म्होरक्या हाफिज सईदला अमेरिकेनं दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. अमेरिका हाफिज सईदला 2008च्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड समजते. तसेच त्यासंदर्भात माहिती देणा-या व्यक्तीला 1 कोटी डॉलरपर्यंत बक्षीसही देण्यात येणार आहे. हाफिज सईद सध्या पाकिस्तानमध्ये स्वतःच्या घरात नजरकैदेत आहे. हाफिज सईदमुळे भारत आणि अमेरिकेशी पाकिस्तानचे संबंध बिघडले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्ताननं अखेर दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने लाहोर हायकोर्टात यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. हाफिज सईदचा दहशतवाद आणि दहशवादी कारवायांशी संबंध असल्याचं या प्रतिज्ञापत्रात स्पष्टपणे मांडण्यात आले आहे.  "हाफिज सईदला काही महिन्यांपासून अवैधरित्या कैदेत ठेवण्यात येत आहे", अशी याचिका जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेनं कोर्टात दाखल केली होती. यावर पाकिस्तान सरकारने कोर्टात सांगितले की, "हाफिज सईदविरोधात अशांतता पसरवण्याबाबत पुरेस पुरावे प्राप्त आहेत. शिवाय त्याच्याविरोधात दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे".कुख्यात दहशतवादी आणि 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिझ सईदला 30 जानेवारीपासून लाहोर येथे नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. सात मुस्लिम बहुल देशांतील नागरिकांना अमेरिका प्रवेश बंदी घालण्यात आल्यानंतर या यादीत आगामी काळात पाकिस्तानाचाही समावेश होणार असल्याचे अमेरिकेकडून देण्यात आले होत. या निर्णयामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाल्याचं दिसून आले होते.  यावर "राष्ट्रहितासाठी घेण्यात आलेल्या धोरणात्मक निर्णयांतर्गत हाफिज सईदवर नजरकैदेची कारवाई करण्यात आली आहे", असा कांगावा पाकिस्तानी सैन्याने केला होता.  शिवाय या निर्णयाला पाकिस्तानची कमजोरी समजू नका, अशा फुशारक्याही पाकिस्ताननं मारल्या होत्या. दरम्यान, अमेरिकेनं हाफिज सईदचा मोस्ट वॉटेंड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केल होता. शिवाय त्याच्या अटकेसाठी मदत करणा-या व्यक्तीला एक कोटी डॉलरचे बक्षीसही घोषित केले होते.