पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 19:28 IST2025-06-09T19:12:10+5:302025-06-09T19:28:01+5:30

पाकिस्तानमधील अर्थसंकल्प काही दिलसातच सादर होणार आहे. यापूर्वी प्री-बजेट आर्थिक सर्वेक्षण अहवालात समोर आला आहे. यामधून धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

Pakistan's debt mountain has increased further Debt at its highest level ever Economic Survey reveals information | पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पाकिस्तानच्या आर्थिक अडचणी काही कमी होत नाहीत. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या पाकिस्तानच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पाकिस्तानचे कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. आता पाकिस्तानची आणखी बिकट आर्थिक स्थिती झाली आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार, पाकिस्तानचे एकूण सार्वजनिक कर्ज ७६,००७ अब्ज पाकिस्तानी रुपये (७६ ट्रिलियन) पर्यंत पोहोचले आहे. हे देशाच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात जास्त कर्ज आहे.

लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद

हे कर्ज भारतीय रुपयांमध्ये २३ लाख कोटी रुपये आहे. गेल्या चार वर्षांत पाकिस्तानचे हे सार्वजनिक कर्ज जवळजवळ दुप्पट झाले आहे, २०२०-२१ मध्ये कर्जाचा हा आकडा ३९,८६० अब्ज रुपये होता. दहा वर्षांपूर्वी, पाकिस्तानचे सार्वजनिक कर्ज १७,३८० अब्ज रुपये होते. पाकिस्तानचे कर्ज पाच पटीने वाढले आहे. 

पाकिस्तानचा १० जूनला अर्थसंकल्प

पाकिस्तान मंगळवारी १० जून रोजी आपला वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी करत आहे. त्याआधी, शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सोमवारी त्यांचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांच्यामार्फत देशाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०२४-२५ प्रसिद्ध केला. ' ७६,००७ अब्ज रुपयांच्या कर्जाच्या या आकड्यात ५१,५१८ अब्ज रुपयांचे देशांतर्गत कर्ज समाविष्ट आहे, तर २४,४८९ अब्ज रुपयांचे बाह्य कर्ज समाविष्ट आहे', असं या अहवालात म्हटले आहे. 

 'जास्त किंवा खराब व्यवस्थापन केलेल्या कर्जामुळे गंभीर असुरक्षा निर्माण होऊ शकतात, असं सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. जर व्याजाचा भार असाच वाढत राहिला आणि त्याची काळजी घेतली नाही तर ते दीर्घकालीन वित्तीय स्थिरता आणि आर्थिक सुरक्षिततेला धोका निर्माण करू शकते. "२०२५ च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत सार्वजनिक कर्जात ६.७ टक्के वाढ झाली, असंही या अहवालात म्हटले आहे. 

काही दिवसापूर्वीच पाकिस्तानला आयएमएफच्या विस्तारित निधी सुविधेअंतर्गत १.०३ अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत मिळाली आहे.

Web Title: Pakistan's debt mountain has increased further Debt at its highest level ever Economic Survey reveals information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.