शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Pok बाबत पाकिस्तानचा मोठा निर्णय; राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी दिली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 14:59 IST

जम्मू काश्मीरसह गिलगिट बाल्टिस्तान आणि लडाख हे भारताचे अधिकृत क्षेत्र आहे. पाकिस्तानने गिलगिट बाल्टिस्तानवर अनधिकृतरित्या ताबा घेतलेला आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तान कोरोनाच्या संकटात पुरता कोलमडलेला असतानाही भारताविरोधातील खुमखुमी काही कमी होत नाहीय. भारतानेपीओकेमधील गिलगिट बाल्टिस्तानमधील सरकारी हस्तक्षेपावर आक्षेप घेतलेला असतानाही निवडणूक घेण्यासाठी आणि काळजीवाहू सरकार बनविण्यासाठी पाकिस्तानने मोठे पाऊल उचलले आहे. 

गिलगिट बाल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग असून पाकिस्तानच्या न्यायपालिकेला त्यावर निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाहीय. या भागाला पाकिस्तानने रिकामे करावे, अशा शद्बांत भारताने पाकिस्तानला ३० एप्रिलला सुनावले होते. मात्र, याकडे पाकिस्तानने दुर्लक्ष केले असून आज पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी निवडणूक घेण्यासाठी आणि काळजीवाहू सरकार बनविण्यासाठी मंजुरी दिली आहे. 

जम्मू काश्मीरसह गिलगिट बाल्टिस्तान आणि लडाख हे भारताचे अधिकृत क्षेत्र आहे. पाकिस्तानने गिलगिट बाल्टिस्तानवर अनधिकृतरित्या ताबा घेतलेला आहे. यामुळे त्यांना न्यायपालिकेद्वारे निर्णय घ्यायचा अधिकार नाही. अशा शब्दांत पाकिस्तानला सुनावले होते. तसेच भारतीय हवामान विभागाने जम्‍मू-काश्‍मीरच्या सब डिव्हीजनला आता  जम्‍मू आणि कश्‍मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्‍तान आणि मुजफ्फराबाद म्हणण्यास सुरुवात केली होती. यावरूनही पाकिस्तान तोंडघशी पडला होता. 

शनिवारी पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट, बाल्टिस्तानबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, या भागात पारदर्शक निवडणुका करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी गिलगिट बाल्टिस्तान आणि काळजीवाहू अधिनियम, २०२० ला मंजुरी दिली आहे. या अधिसुचनेमध्ये असे म्हटले आहे की, गिलगिट, बाल्टिस्तानमध्ये काळजीवाहू सरकार बनविणे गरजेचे बनले आहे. यामुळे या आदेशाद्वारे तेथील काळजीवाहू सरकारला दोन महिन्यांत विधानसभा निवडणुका घेणे बंधनकारक आहे. काही अडचणी आल्यास तेथील काळजीवाहू सरकारचा कार्य़काळही वाढविला जाऊ शकतो. 

या भागावर चीनचाही डोळा आहे. पाकिस्तानन चीनच्या एका कंपनीसोबत ४४२ अब्ज रुपयांच्या एका कंत्राटावर सही केली आहे. यामुळे पाकिस्तानला मोठी गंगाजळी उपलब्ध होणार आहे. गिलगिट बाल्टिस्तानमध्ये एक मोठे धरण बांधले जाणार आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या....

LockDown 4.0 : आज जे घडणार आहे, आपला देश कधीही विसरणार नाही

Lockdown: अज्ञात व्यक्ती देवदूत बनून आला; चार गरजूंचे लाखोंचे कर्ज फेडले

पीओकेवरून तणाव; पाकिस्तानची एफ १६, मिराज लढाऊ विमाने घिरट्या घालू लागली

पाकव्याप्त काश्मीरमध्ये काहीतरी मोठे घडणार?; भारतीय हवामान विभागाचा इशारा

 

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPakistan Electionsपाकिस्तान निवडणूकPOK - pak occupied kashmirपीओकेIndiaभारत