दहशतवादी हल्ल्यात पाकचे ९ सैनिक ठार
By Admin | Updated: July 19, 2014 00:27 IST2014-07-19T00:27:36+5:302014-07-19T00:27:36+5:30
पाकिस्तानच्या खैबर प्रांतात दहशतवाद्यांनी निमलष्करी दलाला लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यात ९ जण मारले गेले.

दहशतवादी हल्ल्यात पाकचे ९ सैनिक ठार
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या खैबर प्रांतात दहशतवाद्यांनी निमलष्करी दलाला लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यात ९ जण मारले गेले. प्रांत राजधानी पेशावरनजीक शुक्रवारी हा हल्ला झाला.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमरूद भागात अज्ञात हल्लेखोरांनी सुरक्षा दलाच्या वाहनांवर घात लावून हल्ला चढविला. यात नऊ सैनिक मारले गेले, तर अन्य एक जण जखमी झाला. सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत चार दहशतवाद्यांचा
खात्मा करण्यात आल्याचे वृत्त आहे; मात्र यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.