नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याचा भारतीय चौक्यांवर गोळीबार

By Admin | Updated: October 4, 2016 09:45 IST2016-10-04T09:26:57+5:302016-10-04T09:45:11+5:30

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय कमांडोंनी दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतरही पाकिस्तानने त्यातून कोणताही धडा घेतलेला नाही.

Pakistani troops fired at Indian posts in Naushra sector | नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याचा भारतीय चौक्यांवर गोळीबार

नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याचा भारतीय चौक्यांवर गोळीबार

 ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. ४ - पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय कमांडोंनी दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतरही पाकिस्तानने त्यातून कोणताही धडा घेतलेला नाही. सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानने मंगळवारी पहाटे सुद्धा भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. 
 
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. पाकिस्तानकडून सकाळी पाच वाजल्यापासून जवळपास तासभर हा गोळीबार सुरु होता. 
 
आणखी वाचा 
 
पाकिस्तानी सैन्याने नौशेरा सेक्टरमधील कालसियानमध्ये तोफांचा मारा केला. भारताने या गोळीबाराला उत्तर दिले. भारताच्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानी लष्कराने आपला गोळीबार थांबवला. पाकिस्तानकडून होणा-या या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे सीमेवर रहाणा-या नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. 

Web Title: Pakistani troops fired at Indian posts in Naushra sector