पाकिस्तानी पंतप्रधान विकणे आहे, किंमत ६२ लाख रुपये

By Admin | Updated: April 14, 2016 19:32 IST2016-04-14T19:32:35+5:302016-04-14T19:32:35+5:30

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट इबेवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह जाहिरात पोस्ट केली आहे. बिनकामाचे पाकिस्तानी पंतप्रधान विकणे आहे, किंमत ६६,२०० पौंड म्हणजे ६२ लाख ४० हजार रुपये,

The Pakistani PM is selling, the price is Rs 62 lakh | पाकिस्तानी पंतप्रधान विकणे आहे, किंमत ६२ लाख रुपये

पाकिस्तानी पंतप्रधान विकणे आहे, किंमत ६२ लाख रुपये

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट इबेवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह जाहिरात पोस्ट केली आहे. बिनकामाचे पाकिस्तानी पंतप्रधान विकणे आहे, किंमत ६६,२०० पौंड म्हणजे ६२ लाख ४० हजार रुपये, असं या जाहिरातीत म्हटलं आहे. ही गंमत नसून युकेतील इबेच्या वेबसाईटवर युझलेस पाकिस्तानी पीएम फॉर सेल या नावाने ही जाहिरात पोस्ट करण्यात आली आहे. ही जाहिरात झळकल्यानंतर अनेकांचे डोळे विस्फारले.
 
महत्त्वाचं म्हणजे या पोस्टवर दहा जणांनी ईबेकडून माहिती मागवली आहे. सोशल मीडियावर या जाहिरातीची जोरदार चर्चा सुरु आहे. युझलेस पाकिस्तानी पीएम फॉर सेल हे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. या वृत्तानंतर ईबेने वेबसाईट वरुन ही जाहीरात काढली आहे. 
 
ईबेवरील जाहिरात 
युझलेस पाकिस्तानी पीएम फॉर सेल
किंमत - ६२ लाख
स्थिती - नवीन परंतु दोषयुक्त
डिलिव्हरी ऑप्शन - भारतात डिलिव्हरी नाही
 

Web Title: The Pakistani PM is selling, the price is Rs 62 lakh