"मी बहादूर शाह जफरचा नातलग, ताजमहाल आणि अयोध्या माझे..."; कुणी केला दावा? पत्रकारानं धोधो धुतला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 14:15 IST2025-04-03T14:14:35+5:302025-04-03T14:15:09+5:30
या व्यक्तीने २०१८ मध्ये, थेट ताजमहालवरच दावा ठोकला होता. तसेच ती मालमत्ता आपल्या पूर्वजांची असून भारत सरकारने ती आपल्याला सोपवावी. मात्र, त्याचा हा दावा कायदेशीरपणे स्वीकारला गेला नाही.

"मी बहादूर शाह जफरचा नातलग, ताजमहाल आणि अयोध्या माझे..."; कुणी केला दावा? पत्रकारानं धोधो धुतला!
पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी या आपल्या बिनधास्त शैलीसाठी प्रसिद्द आहेत. त्या अनेकवेळा भारतीय माध्यमांतही आपली भूमिका मांडताना दिसतात. त्या स्वतःचे यूट्यूब चॅनेलही चालवतात. त्याच्या यूट्यूब चॅनलचे नाव आरजू काझमी असेच आहे. त्या त्यांच्या या यूट्यूब चॅनेलवर रोज भेजा फ्राय नावाचा एक शो होस्ट करत असतात. यावेळी त्यांनी त्यांच्या या शोमध्ये अथवा कार्यक्रमात एका व्यक्तीचा उल्लेख केला आहे. जी व्यक्ती मुघल शासक बहादूर शाह जफरचा नातलग असल्याचा दावा करते. एवढेच नाही तर, ताजमहाल आणि अयोध्या आपली आहे, असेही या व्यक्तीचे म्हनणे आहे. यावर आरजू काझमी यांनी आपल्या कार्यक्रमात अतिशय मजेशीरपणे भाष्य केले आहे. "प्रिन्स याकुब हबीबुद्दीन तुसी नावाच्या व्यक्तीने ज्या प्रकारचे दावे केले आहेत, ते खरोखरच गमतीशीर आहेत," असे आरजू यांनी म्हटले आहे.
आपल्या कार्यक्रमात बोलताना आरजू काझमी म्हणाल्या, त्या भारतीय व्यक्तीचे (प्रिन्स याकुब हबीबुद्दीन तुसी) म्हणणे आहे की, बहादूर शाह जफर आपला पूर्वज होता, यामुळे ताजमहाल आपल्याला देण्यात यावा. शिवाय अयोध्येतही बरीच जमीन आहे, जीच्यावर त्यांनी क्लेम केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, तीही आपल्याला देण्या यावी. आरजू यांनी संबंधित व्यक्तीची खिल्ली उडवत म्हटले आहे की, त्यांना वाटते की, पीएम मोदी त्यांच्याकडे येतील आणि म्हणतील की, 'जहांपनाह' आपण सांगा आम्ही आपल्याला कोण कोणत्या इमारती द्याव्यात?
कोण आहे प्रिंस याकूब हबीबुद्दीन तुसी -
प्रिन्स याकुब हबीबुद्दीन तुसी यांचे नाव अनेक वेळा चर्चेत येत असते. ते स्वतःला मुघल सम्राट बहादूर शाह जफरच्या सहाव्या पिढीतील वंशज म्हणवतात. त्यांची वेशभूषा आणि बोलण्याची शैली देखील मुघल सल्तनत काळाप्रमाणे आहे. याकुब तुसी हे हैदराबादमध्ये असतात. त्यांनी २०१८ मध्ये, थेट ताजमहालवरच दावा ठोकला होता. तसेच ती मालमत्ता आपल्या पूर्वजांची असून भारत सरकारने ती आपल्याला सोपवावी. मात्र, त्याचा हा दावा कायदेशीरपणे स्वीकारला गेला नाही.