शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 21:27 IST

'ऑपरेशन सिंदूर'नंतर अनेक देशात शिष्टमंडळ पाठवून पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचे उघड केले.

भारताने 'ऑपरेशन सिंदूर'चे यश आणि पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचे सत्य जगासमोर उघड केले. भारताने ३३ देशांमध्ये सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे पाठवले. आता पाकिस्तानने भारताची पुन्हा भारताची कॉपी केल्याचं दिसतंय. 

पहलगाम हल्ल्यानंतर जगासमोर पाकिस्तानचे सत्य उघड झाले. दरम्यान , आता पाकिस्तानने सोमवारी अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देशांमध्ये आपले शिष्टमंडळ पाठवले.

रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा

पाकिस्तान या देशांमध्ये जाऊन भारतीय सैन्याने त्यांचे हवाई तळ आणि लष्करी तळ कसे उद्ध्वस्त केले त्यांची बाजू मांडेल. खोटी माहिती देऊन जगाची सहानुभूती मिळवणे हे पाकिस्तानचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या निर्देशानुसार, एक उच्चस्तरीय बहुपक्षीय शिष्टमंडळ सोमवारपासून न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, लंडन आणि ब्रुसेल्सला भेट देत आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने दिली.

नऊ सदस्यांच्या शिष्टमंडळात संघीय मंत्री मुसादिक मलिक, माजी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार आणि खुर्रम दस्तगीर खान, माजी मंत्री सय्यद फैसल अली सब्जवारी, शेरी रहमान, सिनेटर बुशरा अंजुम बट यांचा समावेश आहे. शिष्टमंडळात माजी परराष्ट्र सचिव - जलील अब्बास जिलानी आणि तेहमीना जंजुआ यांचाही समावेश आहे.

भारताने ३३ देशांना भेट देऊन फक्त पाकिस्तानचा पर्दाफाश केला नाही तर भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास पाकिस्तानला मोठे नुकसान सहन करावे लागेल असा संदेशही दिला. तर दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर अनेक देशांनी पाकिस्तानचा निषेध केला.

लश्कर-ए-तोयबा आणि जैश ए मोहम्मदचा भारताविरोधात नवा कट उघड

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला केला. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला. आता लश्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद यांनी बांगलादेशातील कट्टरपंथींसोबत हात मिळवणी केली आहे. भारतात दहशतवाद्यांचे नवे नेटवर्क उभं करून स्लीपर सेल बनवण्यासाठी त्यांची मदत घेतली जाणार आहे. या दोन्ही दहशतवादी संघटना भारताने केलेल्या कारवाईनंतर आक्रमक झाल्या आहेत. या हल्ल्याचा बदला घेण्याची संधी ते शोधत आहेत. सध्या भारत-बांगलादेश यांच्यात संबंध ठीक नाहीत त्याचा पाकिस्तानी दहशतवादी फायदा घेण्याच्या तयारीत आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर