शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान काळ्या यादीच्या उंबरठ्यावर; मनधरणीसाठी 20 तज्ज्ञ बँकॉकला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 08:25 IST

पाकिस्तान एफएटीएफला मनविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समोर आले.

दहशतवाद्यांना पैसे पुरविणे आणि मनी लाँड्रिंगवर चाप बसविण्यासाठी अपयशी ठरल्याने पाकिस्तान काळ्या यादीमध्ये जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे या कारवाईपासून वाचण्यासाठी आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पाकने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे पाकिस्तानी तज्ज्ञांची 20 जणांची टीम जगावर लक्ष ठेवणाऱ्या फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स  (एफएटीएफ) चे मन वळविण्यासाठी बँकॉकला रवाना झाली आहे. 

एका वृत्तानुसार रविवारी पाकिस्तान एफएटीएफला मनविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समोर आले. पाकिस्तानला आधीच ग्रे लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यासाठी 13 ते 18 ऑक्टोबर यावेळी होणाऱ्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची वाळूच सरकली असून द एक्स्प्रेस ट्रिब्यूननुसार रविवारी पाकिस्तानचे मंत्री  हम्माद अजहर यांच्या नेतृत्वाखाली 20 जणांची टीम बँकॉकला रवाना झाली आहे. यामध्ये पाकिस्तानच्या विविध खात्यांचे अधिकारी सहभागी आहेत.

एफएटीएफसोबत सोमवारपासून चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. ही चर्चा 13 सप्टेंबरपर्यंत चालण्याची शक्यता पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. यामध्ये पाकिस्तानचे नाव ग्रे लिस्टमध्येच ठेवायचे की ब्लॅकलिस्टमध्ये याबाबत निर्णय होईल. 

एफएटीएफचा आशिया-प्रशांत गटाने केले आधीच ब्लॅकलिस्टएफएटीएफच्या आशिया-प्रशांत गटाने आधीच पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट केले आहे. यामुळे पाकिस्तानला दर तिमाहीला या गटाला अहवाल द्यावा लागत आहे. तसेच त्यांना 125 प्रश्न विचारले आहेत. यांची उत्तरेही एफएटीएफच्या आजच्या बैठकीत द्यावी लागणार आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानMONEYपैसाTerrorismदहशतवाद