शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

1999मध्ये भारतीय विमान 'हायजॅक' करणारा दहशतवादी ठार, पाकिस्तानात नाव बदलून राहत होता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 12:43 PM

24 डिसेंबर 1999 रोजी एअर इंडियाच्या IC-814 विमानाचे अपहरण करणाऱ्या पाच दहशतवाद्यांपैकी जहूर मिस्त्री उर्फ ​​जाहिद अखुंद याची कराचीत हत्या झाल्याची बातमी समोर आली आहे.

कराची: 24 डिसेंबर 1999 रोजी एअर इंडियाच्या IC-814 विमानाचे अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी जहूर मिस्त्री उर्फ ​​जाहिद अखुंद याची हत्या झाल्याची बातमी समोर आली आहे. पाकिस्तानातील कराची येथे त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, 1 मार्च रोजी दुचाकीवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी टार्गेट किलिंग अंतर्गत घरात घुसून जहूर मिस्त्रीवर गोळ्या झाडल्या. जहूर मिस्त्री हा जैशचा दहशतवादी होता आणि कराचीमध्ये व्यापाऱ्याची छुपी ओळख घेऊन राहत होता.

जैशच्या दहशतवाद्यांमध्ये खळबळदोन्ही हल्लेखोरांचे फुटेजही सीसीटीव्हीत कैद झाले आहेत, मात्र दोघांनी मास्क घातले असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. या हत्याकांडाने जैशच्या दहशतवाद्यांमध्ये खळबळ उडाली असून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयही हैराण झाली आहे. पाकिस्तानी मीडियामध्ये या हत्याकांडाचे कुठेही कव्हरेज नाही. पाकिस्तानच्या जिओ टीव्हीने या हत्याकांडाचे वृत्त दिले असले तरी झहूर मिस्त्रीचे खरे नाव समोर आले नाही.

अंत्यविधीत अनेक दहशतवादी सामीलजिओ टीव्हीने आपल्या अहवालात फक्त असे म्हटले आहे की, कराचीमध्ये एका व्यावसायिकाची हत्या करण्यात आली आहे. अहवालात सीसीटीव्ही फुटेजही दाखवण्यात आले असून, हत्येचा कट रचण्यात आल्याचे सांगण्यात आले. जहूर मिस्त्रीच्या हत्येनंतर घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दहशतवाद्याच्या अंत्यसंस्कारात जैशचे अनेक बडे दहशतवादी सामील झाल्याचीही बातमी आहे.

कोण होता जुहूर मिस्त्री?जैशचा दहशतवादी जहूर मिस्त्री हा एअर इंडियाचे IC-814 अपहरण करणाऱ्या पाच दहशतवाद्यांपैकी एक होता. 24 डिसेंबर 1999 रोजी दहशतवाद्यांनी एका भारतीय विमानाचे हवेतून अपहरण केले होते. नेपाळमधील काठमांडू येथून विमानाचे अपहरण करुन ते अफगाणिस्तानातील कंदाहार येथे नेण्यात आले होते.

काय होती त्यांची मागणी?मसूद अझहर, मुश्ताक अहमद आणि अहमद उमर सईद शेख या दहशतवाद्यांच्या सुटकेच्या बदल्यात प्रवाशांच्या सुटकेची अट ठेवण्यात आली होती. यादरम्यान, विमानातील प्रवासी आठवडाभर दहशतवाद्यांच्या ताब्यात होते. त्या विमान अपहरणात एका प्रवाशाचा मृत्यूही झाला होता. पण, सुदैवाने 170 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली. त्या घटनेनंतर जहूर भूमिगत झाला, काही काळानंतर तो कराचीमध्ये नाव बदलून व्यवसाय करत असल्याचे समजले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदterroristदहशतवादीDeathमृत्यू