शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 19:20 IST

Pakistan Shahbaz Sharif PoK Issue: पाकव्याप्त काश्मीर गमावण्याच्या भीतीने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी निवेदन जारी केले आहे

Pakistan Shahbaz Sharif PoK Issue: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध गेल्या काही महिन्यांपासून तणावाचे झाले आहेत. तशातच पाकव्याप्त काश्मीरमध्येही प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलकांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या दिवशी ददयालमध्ये आंदोलक आणि पाकिस्तानी रेंजर्स यांच्यात संघर्ष झाला. निदर्शने दडपण्यासाठी सरकारने हजारोंचे सैन्य तैनात केले आहे. मात्र मुझफ्फराबादच्या पलीकडे असलेल्या रावलकोट, नीलम व्हॅली आणि कोटलीसह इतर भागात हिंसाचाराचा परिणाम झाला आहे आणि पाकव्याप्त काश्मीर गमवावे लागते की काय, अशी चिंता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना सतावू लागली आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकरणावर एक निवेदन जारी केले आहे.

शरीफ निवेदनात म्हणतात की, कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या संस्थांनी आंदोलकांशी संयमाने वागावे, सार्वजनिक भावनांचा आदर करावा आणि आवश्यक नसल्यास कोणतीही कठोर कारवाई टाळावी. शाहबाज यांनी घटनेची पारदर्शक चौकशी करण्याचे आणि मृतांच्या कुटुंबीयांना त्वरित मदत करण्याचेही निर्देश दिले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पीओकेमध्ये पीपल्स अ‍ॅक्शन कमिटी निदर्शनांचे नेतृत्व करत आहे. बुधवारी, आंदोलक आणि पोलिसांमधील संघर्षात तीन पोलिसही ठार झाले आणि १५० जण जखमी झाले आहेत.

PoK मध्ये सध्या काय घडतंय?

२९ सप्टेंबरला अवामी कृती समिती (AAC)च्या नेतृत्वाखाली आंदोलक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि अनिश्चित काळासाठी 'बंद आणि चक्का जाम' संप पुकारला. अवामी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हजारो लोकांनी आंदोलने केली. वीजेवरील अनुदान बंद करण्याची आणि काश्मिरी निर्वासितांसाठी राखीव असलेल्या १२ विधानसभेच्या जागा रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

पाकिस्तानसाठी PoK महत्त्वाचे का?

पाकव्याप्त काश्मीर हे पाकिस्तानसाठी सामरिक, आर्थिक, भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. गिलगिट-बाल्टिस्तानचा नकाशा त्यांचे सामरिक आणि भौगोलिक महत्त्व दर्शवितो. कारण या मार्गाशिवाय पाकिस्तानचे ग्वादार बंदर चीनसाठी काहाही कामाचे नसेल. येथूनच चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) जातो, जो पाकिस्तानमार्गे चीनला मध्य आणि पश्चिम आशियाशी जोडतो.

English
हिंदी सारांश
Web Title : PoK unrest worries Pakistan; Sharif orders restraint amid deadly clashes.

Web Summary : Pakistan PM Sharif urges restraint as deadly clashes erupt in PoK over protests. The region's strategic importance, especially for CPEC, fuels Pakistan's concerns. Unrest involves demands for electricity subsidies and assembly seat cancellations. Thousands of troops have been deployed.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानPOK - pak occupied kashmirपीओकेprime ministerपंतप्रधान