पाकिस्तानने मानवी हक्कांचे धडे आम्हाला तरी देऊ नयेत, मानवी हक्क परिषदेत भारताने ठणकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 01:46 IST2018-03-11T01:46:08+5:302018-03-11T01:46:08+5:30
ज्या देशांत दहशतवादी उजळ माथ्याने वावरतात व जेथे ओसामा बिन लादेनला राजाश्रय दिला जातो त्या एक राष्ट्र म्हणून पार अपयशी ठरलेल्या पाकिस्तानने जगाला लोकशाही व मानवी हक्कांचे धडे देण्याची गरज नाही, अशी कडक निर्भत्सना भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या येथे सुरु असलेल्या मानवी हक्क परिषदेत केली.

पाकिस्तानने मानवी हक्कांचे धडे आम्हाला तरी देऊ नयेत, मानवी हक्क परिषदेत भारताने ठणकावले
जिनिव्हा - ज्या देशांत दहशतवादी उजळ माथ्याने वावरतात व जेथे ओसामा बिन लादेनला राजाश्रय दिला जातो त्या एक राष्ट्र म्हणून पार अपयशी ठरलेल्या पाकिस्तानने जगाला लोकशाही व मानवी हक्कांचे धडे देण्याची गरज नाही, अशी कडक निर्भत्सना भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या येथे सुरु असलेल्या मानवी हक्क परिषदेत केली.
पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी मानवी हक्कांच्या पायमल्लीचा आरोप करून काश्मीरचा प्रश्न या व्यासपीठावर उपस्थित करण्याचा प्रयत्न करताच भारताच्या प्रतिनिधी मिनी देवी कुमाम यांनी अत्यंत कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले. अशा चोराच्या उलट्या बोंबा मारण्याऐवजी मुंबई, पठाणकोट व उरी येथील दहशतवादी हल्ल्यांच्या सूत्रधारांना कायद्याच्या हवाली करावे, असे त्यांनी ठणकावून पाकिस्तानला सांगितले. (वृत्तसंस्था)