Israel Hamas Conflict: पाकिस्तान सैन्याकडून हमासला प्रशिक्षण!; खासदाराच्या दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 07:43 AM2021-06-07T07:43:52+5:302021-06-07T07:44:34+5:30

Israel Hamas Conflict: गाझा पट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांना पाकिस्तान सैन्याकडून प्रशिक्षण दिले जात असल्याचा खळबळजनक दावा पाक खासदाराने केला आहे.

pakistan senate member raja zafar ul haq claims that pakistan army training hamas against israel | Israel Hamas Conflict: पाकिस्तान सैन्याकडून हमासला प्रशिक्षण!; खासदाराच्या दाव्याने खळबळ

Israel Hamas Conflict: पाकिस्तान सैन्याकडून हमासला प्रशिक्षण!; खासदाराच्या दाव्याने खळबळ

Next

इस्लामाबाद:इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पेटू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्यासाठी हमास हजारो रॉकेटची निर्मिती केली जात असल्याचे वृत्त अलीकडेच आले होते. यातच आता गाझा पट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांना पाकिस्तान सैन्याकडून प्रशिक्षण दिले जात असल्याचा मोठा दावा पाकिस्तानचे खासदार राजा जफर उल हक यांनी केला आहे. या दाव्यानंतर खळबळ उडाली असून, चर्चांना सुरुवात झाली आहे. (pakistan senate member raja zafar ul haq claims that pakistan army training hamas against israel)

खासदार राजा जफर उल हक हे पाकिस्तानचे माजी मुसद्दी अधिकारी होते. पाकिस्तानी सैन्याकडून फार आधीपासून हमास गटाला प्रशिक्षण दिले जात आहे. पाकिस्तान सैन्याचे स्पेशल कमांडो युनिट एसएसजीचे एक बटालियन याआधीपासून प्रशिक्षण केंद्र चालवण्यासाठी गाझामध्ये असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 

“पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग जबाबदार नेते; भारत-चीन प्रश्न सोडवण्यास सक्षम”: पुतिन

पाक लष्कराकडून आजही प्रशिक्षण सुरूच

मी ट्युनिशियाच्या दौऱ्यावर होतो. त्यावेळी अबू जिहाद जीवंत होते. त्यांच्यासोबत माझी भेट घडवून देण्यात आली. इस्रायलसोबत युद्ध वा संघर्ष होतो, तेव्हा पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेतलेले सैन्य लढते. पाकिस्तानचे पूर्वीपासून हमासशी संबंध असून, आजही पाकिस्तानी सैन्य हमासच्या गटाला प्रशिक्षण देत असल्याचे राजा जफर उल हक यांनी सांगितले. अबू जिहाद गाझामध्ये सक्रिय असलेले फतह पक्षाचे सहसंस्थापक होते.

मेहुल चोक्सीला जामीन नाकारला; भारताकडे प्रत्यार्पणाच्या दिशेने एक पाऊल?

दरम्यान, पाकिस्तानने इस्रायलला अजूनही एक देश म्हणून मान्यता दिलेली नाही. अरब देशांसोबत पाकिस्ताननेही इस्रायलला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे, असे सांगितले जाते. तर, दुसरीकडे हमास आणि इस्रायलमध्ये १० मे रोजी भीषण संघर्ष सुरू झाला होता. त्यानंतर जवळपास ११ सुरू असलेल्या संघर्षात हमासने इस्रायलवर ४ हजारांवर रॉकेट डागल्याचे सांगितले जात आहे. तासनिम या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलवर हजारो रॉकेटचा मारा करणाऱ्या हमासकडून पु्न्हा एकदा हल्ला होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायल आणि हमासमध्ये शस्त्रसंधी घडवून आणण्यास इजिप्तने मध्यस्थी केली.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: pakistan senate member raja zafar ul haq claims that pakistan army training hamas against israel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app