भारताचे आरोप पाकने फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 04:12 IST2017-12-30T04:12:29+5:302017-12-30T04:12:37+5:30

इस्लामाबाद : कुलभूषण जाधव यांच्या भेटीसाठी गेलेल्या पत्नी व आईला अपमानास्पद वागणूक दिल्याच्या भारताच्या आरोपाचा पाकिस्तानने इन्कार केला.

Pakistan rejects accusations | भारताचे आरोप पाकने फेटाळले

भारताचे आरोप पाकने फेटाळले

इस्लामाबाद : कुलभूषण जाधव यांच्या भेटीसाठी गेलेल्या पत्नी व आईला अपमानास्पद वागणूक दिल्याच्या भारताच्या आरोपाचा पाकिस्तानने इन्कार केला. दोघींना सन्मानानेच वागविल्याचा दावा त्यांनी केला आहे. मंगळसूत्र, बांगड्या व टिकली काढायला लावून धार्मिक व सांस्कृतिक भावना दुखावल्याचा प्रश्नच नाही. कारण, भेट अशाच पद्धतीने होईल हे उभय देशांदरम्यान राजनैतिक वाटाघाटींमध्ये आधीच ठरले होते, असेही पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी यांच्या सरकारने म्हटले आहे की, जाधव यांची आई भेटीने समाधानी होती कारण त्यांनी पाकिस्तानचे आभारही मानले आहेत. दोघींना मराठीत बोलू न दिल्याने त्यांचे काही अडले नाही कारण त्या इंग्रजीत चांगल्या प्रकारे बोलू शकत होत्या. भारतीय माध्यमांनी पराचा कावळा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Pakistan rejects accusations