पाकिस्तान दोन बेटे चीनला आंदण देण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 09:16 AM2020-10-26T09:16:45+5:302020-10-26T09:17:11+5:30

पाकिस्तानातील इम्रान खान सरकार सिंधमधील नागरिक अथवा  सरकारच्या परनानगीशिवाय चीन सरकारच्या  मागणीवर सिंधशी संबंधित बौद्ध आणि बुंधल  बेट चीनला आंदण देण्याच्या तयारीत आहे.

Pakistan is ready to give pleasure to two islands, China | पाकिस्तान दोन बेटे चीनला आंदण देण्याच्या तयारीत

पाकिस्तान दोन बेटे चीनला आंदण देण्याच्या तयारीत

Next

इस्लामाबाद: पाकिस्तानातील इम्रान खान सरकार सिंधमधील नागरिक अथवा  सरकारच्या परनानगीशिवाय चीन सरकारच्या  मागणीवर सिंधशी संबंधित बौद्ध आणि बुंधल  बेट चीनला आंदण देण्याच्या तयारीत आहे. अर्थात यामागे चीनचा मोठा कट आहे. चीन आता पाकिस्तानच्या सहकार्याने अरबी समुद्रात वि्स्तार   करून मजबूत होऊ इच्छितो. असे दिसते.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मागील वर्षी चीन दौऱ्यात  सिंध आणि बलुचिस्तानचा किनारी भाग आणि बेटे विकसित करण्याची इच्छा व्यक्त केली होती.  या भागात पाय पसरण्याच्या  उद्देशाने चीनने आठ  बेटांच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. चीन आता मोठ्या 
चातुर्याने या बेटांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. या बेटांवर विकासाशी संबंधित बहुतांश काम चिनी इंजिनीअरकडून करण्यात . येत आहे.

Web Title: Pakistan is ready to give pleasure to two islands, China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.