शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

पाकिस्तानात सात वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून निर्घृण हत्या; निषेधार्थ रस्त्यावर उतरली जनता, दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 2:14 PM

सात वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच्या निशेधार्थ लोकांमध्ये आक्रोश वाढला. आणि लोक रस्त्यावर उतरलेत.

कराची : पाकिस्तानमध्ये सात वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याघटनेचा निषेध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरलेत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ही घटना घडली आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका सात वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांविरुद्ध हिंसक आंदोलन केलं. पाकिस्तानी वृत्तपत्र ' द डॉन' च्या वृत्तानुसार पंजाब प्रांतातील कासुर जिल्ह्यात काल पीडित मुलीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर लोक रस्त्यावर उतरले. त्यांनंतर या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं आहे.  या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेच्या विरुद्ध इथली जनता रस्त्यावर उतरली आहे.सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने हाती आलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात कासुर जिल्ह्यातील राहत्या घरासमोरून चिमुरडीचं अपहरण करण्यात आले होते. मंगळवारी तिचे शव कचऱ्याच्या ढिगात आढळले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत मुलीचं शव ताब्यात घेतलं. त्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठविलं. शवविच्छेदनात बलात्कारानंतर गळा दाबून या चिमुरडीची हत्या करण्यात आल्याची बाब उघड झाली आहे.

पीडित मुलीचे आई-वडील तिर्थयात्रेसाठी गेले असताना ही घटना घडली. आई-वडील घरी नसल्याने चिमुरडी आपल्या नातेवाईकांसोबत राहत होती. दरम्यान, पोलिसांनी या घटनेत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाRapeबलात्कारPakistanपाकिस्तान