पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेच्या वेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी भेट घेत असताना पाकिस्तानी पंतप्रधानांना लाजिरवाणेपणाचा सामना करावा लागला. या संभाषणादरम्यान, शाहबाज शरीफ वारंवार इअरफोन घालण्याचा प्रयत्न करताना दिसले, तर त्यांच्या समोर बसलेले रशियन राष्ट्राध्यक्ष त्यांना इअरफोन घालण्यास सांगत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पाकिस्तानी पंतप्रधानांना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासमोर अपमानित होण्याची ही दुसरी वेळ आहे. तीन वर्षांपूर्वी जेव्हा दोन्ही नेते उझबेकिस्तानमध्ये भेटले होते, तेव्हा शाहबाज शरीफ यांना असाच एका लाजिरवाण्या घटनेला सामोरे जावे लागले होते. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष हातवारे करुन दाखवत राहिले
शाहबाज शरीफ यांचा इअरफोन हेडसेट कानात घालण्याचा प्रयत्न करूनही तो वारंवार घसरत राहतो आणि खाली पडत राहतो. यादरम्यान, पुतिन काही सेकंदांसाठी शाहबाज शरीफ यांच्याकडे हसताना दिसत आहेत. जागतिक स्तरावर लाजिरवाणेपणा टाळण्यासाठी, रशियन नेत्याने त्यांचा इअरफोन उचलला आणि पाकिस्तानी राष्ट्रपतींना तो कसा लावायचा हे दाखवले.
या घटनेवरून सोशल मीडिया वापरकर्ते शाहबाज शरीफ यांची खिल्ली उडवत आहेत. एका वापरकर्त्याने इअरफोन खराब झाल्याचा व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले, "बीजिंगमध्ये शाहबाज शरीफ यांचे इअरफोन घसरले तेव्हा पुतिन पुन्हा हसले.
यापूर्वीही अशीच घटना घडली होती
शरीफ यांना इअरफोन घालण्यात अडचण येण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर, २०२२ मध्ये उझबेकिस्तानमध्ये झालेल्या शिखर परिषदेदरम्यान पुतिन यांच्यासमोर त्यांना अशाच समस्येचा सामना करावा लागला होता. त्यांच्यातील चर्चा सुरू होत असताना त्यांचे इअरफोन वारंवार घसरत राहिले आणि अधिकाऱ्यांनी ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करूनही हे सुरूच राहिले.