अण्वस्त्र प्रदर्शनासाठी ठेवलेली नाही, पाकिस्तानची भारताला धमकी

By Admin | Updated: September 29, 2016 12:41 IST2016-09-29T07:47:55+5:302016-09-29T12:41:22+5:30

पाकिस्तानच्या सुरक्षेला धोका असेल तर भारताविरोधात अण्वस्त्र वापरु अशी धमकी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसीफ यांनी दिली आहे

Pakistan is not placed for nuclear display, Pakistan threatens India | अण्वस्त्र प्रदर्शनासाठी ठेवलेली नाही, पाकिस्तानची भारताला धमकी

अण्वस्त्र प्रदर्शनासाठी ठेवलेली नाही, पाकिस्तानची भारताला धमकी

>
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - पाकिस्तानच्या सुरक्षेला धोका असेल तर भारताविरोधात अण्वस्त्र वापरु अशी धमकी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसीफ यांनी दिली आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनी समाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 
 
'आमच्याकडे जी अण्वस्त्र आहेत, जे प्रोग्राम्स आम्ही विकसित केले आहेत ते आमच्या सुरक्षेसाठी आहेत. फक्त प्रदर्शनासाठी म्हणून अण्वस्त्र ठेवलेले नाहीत. जर आम्हाला धोका असेल तर भारताला नेस्तनाभूत करुन टाकू', असं ख्वाजा मोहम्मद आसीफ बोलले आहेत. आसीफ यांनी दिलेली मुलाखत 26 सप्टेंबरला प्रसारित करण्यात आली होती. अशा प्रकारचं स्फोटक वक्तव्य करण्याची आसीफ यांची ही पहिलीच वेळ नाही. उरी दहशतवादी हल्ला होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 17 सप्टेंबरलाही आसीफ यांनी जिओ टीव्हीवर हेच वक्तव्य केलं होतं.
 

Web Title: Pakistan is not placed for nuclear display, Pakistan threatens India