पाकिस्तानची संसद ९ ऑगस्टला होणार विसर्जित, निवडणुका ९० दिवसांत होतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 07:35 PM2023-07-31T19:35:16+5:302023-07-31T19:36:53+5:30

सध्या पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहे आणि निवडणुका वेळेपूर्वी होणार आहेत.

pakistan national assembly dissolve on 9 august | पाकिस्तानची संसद ९ ऑगस्टला होणार विसर्जित, निवडणुका ९० दिवसांत होतील!

पाकिस्तानची संसद ९ ऑगस्टला होणार विसर्जित, निवडणुका ९० दिवसांत होतील!

googlenewsNext

पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याची तारीख 9 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. काळजीवाहू पंतप्रधानासाठी चार ते पाच नावांवर एकमत झाले आहे. दरम्यान, सध्या पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहे आणि निवडणुका वेळेपूर्वी होणार आहेत.

पाकिस्तानी मीडियानुसार, ख्वाजा आसिफ म्हणाले की, काळजीवाहू पंतप्रधानांसाठी पीपल्स पार्टीची चार दिवसांपूर्वी बैठक झाली. या बैठकीत चार ते पाच नावांवर एकमत झाले. चर्चेनंतर नावे नेतृत्वाकडे जातील. काळजीवाहू पंतप्रधानांसाठी दिलेली नावे प्रतिष्ठेचे सामान्य नागरिक आहेत. एक राजकारणाशी संबंधित आहे, तर एका व्यक्तिमत्त्वाचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, असेही संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. पाकिस्तानमध्ये काळजीवाहू सरकार स्थापन झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत निवडणुका होतील. सध्याच्या सभागृहाचा कार्यकाळ पूर्ण झाला असता तर ६० दिवसांत निवडणुका झाल्या असत्या.

दुसरीकडे, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या परतण्याची तयारी जवळपास सुरू झाली आहे. ते युरोप दौऱ्यावरून परतल्यानंतर लंडनमध्ये पत्रकार परिषदेत पाकिस्तानात परतण्याची तारीख आणि रणनीती जाहीर करतील. नवाझ शरीफ पुढील ४८ तासांत लंडनला परततील. याठिकाणी ते उच्च नेतृत्वाशी सल्लामसलत करून रणनीती आखणार आहेत. नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एनचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचे म्हटले जात आहे.

निवडणुकीशी संबंधित सर्व नियोजन स्वत: नवाझ शरीफ करत आहेत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवाझ शरीफ मायदेशी परतल्यावर लाहोरमध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. पुढील निवडणुकीत पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. निवडणुकीशी संबंधित सर्व नियोजन नवाझ शरीफ स्वत: करत असून पक्षातील कोणत्या नेत्याला जबाबदारी दिली जाईल, याची यादी तयार करण्यात आली आहे. याचबरोबर, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मित्रपक्षांशी चर्चा करून १२ ऑगस्टपूर्वी नॅशनल असेंब्ली विसर्जित केली जाईल, असे आधीच सांगितले होते. पुढील निवडणुकीची तारीख निवडणूक आयोग जाहीर करेल, असेही ते म्हणाले होते.

Web Title: pakistan national assembly dissolve on 9 august

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.