Pakistan : कराची विद्यापीठात मोठा स्फोट, 5 जणांचा मृत्यू; अनेक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 17:34 IST2022-04-26T17:34:03+5:302022-04-26T17:34:44+5:30
पाकिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Pakistan : कराची विद्यापीठात मोठा स्फोट, 5 जणांचा मृत्यू; अनेक जखमी
पाकिस्तानातील कराची विद्यापीठात मोठा स्फोट (Blast at Karachi University) झाला आहे. या स्फोटा 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानातील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा स्फोट कराची विद्यापीठाच्या कन्फ्यूशियस इन्स्टिट्यूटजवळ एका व्हॅनमध्ये झाला. यानंतर व्हॅनला आग लागली होती.
पाकिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कराची विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये लागलेल्या आगीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पांढऱ्या रंगाची व्हॅन जळताना दिसत आहे. या व्हॅनमधून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. हा स्फोट एढा मोठा होता, की जवळपास असलेल्या इमारतींच्या खिडक्यांही फुटल्याचे दिसत आहे. ही कार वाणिज्य विभागाच्या जवळच असलेल्या कन्फ्यूशियस इन्स्टिट्यूटकडे वळत असतानाच व्हॅनमध्ये स्फोट झाला आणि आग लागली, असेही वृत्तात म्हणण्यात आले आहे.
स्फोटाचं नेमकं कारण काय?
व्हॅनमध्ये झालेला स्फोट आणि लागलेली आग ही नैसर्गिक कारणांमुळे लागली. एसपी गुलशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज खूपच मोठा होता. यामुळे बॉम्ब डिस्पोजल पथकालाही घठनास्थळी बोलावण्यात आले होते. मात्र, हे सर्व नैसर्गिक कारणांमुळेच झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
सिंधचे आयजी मुश्ताक अहमद महार यांनी मुख्यमंत्री मुराद अली शाह यांच्यासोबत एका फोन कॉलवर 5 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. हा स्फोट दुपारी 2.30 च्या सुमारास झाला.