पाकने केली भारताकडून नुकसानभरपाईची मागणी

By Admin | Updated: November 10, 2016 04:37 IST2016-11-10T04:37:02+5:302016-11-10T04:37:02+5:30

भारताने क्रिकेट मालिका रद्द केल्यामुळे ‘बीसीसीआय’ने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे केली आहे.

Pakistan made a demand for compensation from India | पाकने केली भारताकडून नुकसानभरपाईची मागणी

पाकने केली भारताकडून नुकसानभरपाईची मागणी

कराची : भारताने द्विपक्षीय क्रिकेट मालिका रद्द केल्यामुळे ‘बीसीसीआय’ने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे केली आहे.

‘पीसीबी’च्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष नजम सेठ म्हणाले, ‘आम्ही नुकतेच आयसीसी व बीसीसीआयला कळवले आहे की, भारताने पाकिस्तानबरोबर क्रिकेट मालिका खेळावी किंवा पीसीबीला नुकसानभरपाई द्यावी.’ एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सेठ म्हणाले की, ‘नियोजित कार्यक्रमानुसार भारताने पाकिस्तानबरोबरची मालिका रद्द केल्यामुळे पीसीबीला मोठे नुकसान सोसावे लागले आहे.’

मागील वर्षी डिसेंबरमध्ये पाकिस्तान - भारत दरम्यान क्रिकेट मालिका होणार होती. मात्र, दोन्ही देशांदरम्यानच्या तणावपूर्ण संबंधांमुळे भारताने ही मालिका खेळण्यास नकार दिला. पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी ही मालिका व्हावी, यासाठी अनेक प्रयत्न केले होते. मात्र, यात त्यांना यश आले नाही. 

Web Title: Pakistan made a demand for compensation from India