पाकिस्तान खोटे बोलला! बीएलए म्हणाले, युद्ध संपलेले नाही, १०० हून अधिक सैनिक मारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 16:04 IST2025-03-14T15:36:37+5:302025-03-14T16:04:10+5:30
पाकिस्तानच्या १०० हून अधिक सैनिकांना मारल्याचा बलुच बंडखोरांनी दावा केला आहे.

पाकिस्तान खोटे बोलला! बीएलए म्हणाले, युद्ध संपलेले नाही, १०० हून अधिक सैनिक मारले
पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसला बलुच बंडखोरांनी ओलीस ठेवले. या प्रकरणावरुन अनेक दावे करण्यात आले आहेत. सुरुवातीला पाकिस्तानने ऑपरेशन संपल्याचे जाहीर केले. आता याबाबत नवीनच अपडेट समोर आली आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने ऑपरेशन संपलेले नाही आणि सैन्यासोबतचे युद्ध सुरूच आहे. या गटाने १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना मारल्याचा दावाही केला आहे.
युक्रेनने रशियाच्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर हल्ला केला, मोठी आग लागली; व्हिडीओ समोर आला
गुरुवारी, बीएलएने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनानुसीर, पाकिस्तानी सैन्य मृतांची खरी संख्या लपवत आहे कारण त्यांना सैन्याचे मनोबल तोडायचे नाही. तसेच, आंतरराष्ट्रीय माध्यमांना चौकशी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाकिस्तानी सैन्याचा दावा आहे की त्यांनी ३४० हून अधिक प्रवाशांना सुरक्षितपणे वाचवले आहे. त्यात असेही म्हटले आहे की २८ सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
बीएलएने एक निवेदन जारी केले आहे. पाकिस्तानच्या आयएसपीआरने ऑपरेशन संपल्याचा केलेला दावा खोटा आहे आणि युद्ध अजूनही सुरू आहे. पाकिस्तानी लष्कराने अद्याप १०० हून अधिक मारल्या गेलेल्या पाकिस्तानी सैनिकांची नावे आणि फोटो सार्वजनिक केलेली नाहीत. ३३ बलुच सैनिकांची नावे आणि फोटो देखील अजूनही जाहीर केलेली नाहीत.
पाकिस्तानचे १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना मारले आहे, बलुच बंडखोरांचा दावा आहे. बीएलएने स्फोटाचा एक व्हिडीओ जारी केला, या व्हिडीओत अनेक लढाऊ लपण्याच्या ठिकाणाहून ट्रेनवर हल्ला करण्यासाठी बाहेर येत असल्याचं दिसत आहे.
भारताने प्रत्युत्तर दिले
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, 'पाकिस्तानने केलेले निराधार आरोप आम्ही पूर्णपणे फेटाळतो. जागतिक दहशतवादाचे केंद्र कुठे आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे. पाकिस्तानने इतरांवर बोटे दाखवण्याऐवजी आणि त्यांच्या अंतर्गत अपयशाचे खापर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे.