शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

भारतासोबत पुन्हा तणाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय पाकिस्तान; दुसऱ्या देशात जाऊन काश्मीर प्रश्न उपस्थित केला अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 08:27 IST

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर प्रश्न उपस्थित करून पुन्हा एकदा भारताच्या वाकड्यात शिरण्याचा प्रयत्न केला आहे.

पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित केला आहे. इतकंच नाही तर, हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला नाही तर, ते विनाशकारी ठरू शकते, असे वक्तव्य पाकिस्तानच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने म्हटले आहे. जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध अजूनही तणावपूर्ण असताना, पाकिस्तानने हे वक्तव्य केले आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीरचा मुद्दा देखील अतिशय ज्वलंत प्रश्न ठरत आहे. 

डॉन वृत्तपत्राचा हवाला देत पीटीआयने म्हटले की, पाकिस्तानच्या जॉईंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे प्रमुख जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी शनिवारी संध्याकाळी सिंगापूरमध्ये आशियचा प्रमुख संरक्षण मंच शांग्री-ला डायलॉगमध्ये हे भाष्य केले. भारताने काश्मीरचा मुद्दा सातत्याने द्वीपक्षीय मुद्दा म्हणून पाहिला आहे. परंतु, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर वारंवार काश्मीरचा उल्लेख केला, असे ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'प्रादेशिक संकट-व्यवस्थापन यंत्रणा' या विषयावरील सत्रादरम्यान जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी काश्मीरचा उल्लेख वाद म्हणून केला. या मुद्द्द्यावर आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी अशा देशांचाही उल्लेख केला, जे मध्यस्थीची भूमिका बजावू शकतात. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया, चीन, तुर्की आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे. 

काश्मीर प्रश्न लवकर सोडवणे आवश्यक!  जनरल साहिर शमशाद मिर्झा म्हणाले की, "संघर्ष नियंत्रणापलीकडे जाऊन संघर्ष निराकरणाकडे जाणे अत्यावश्यक झाले आहे. यामुळे शांतता प्रस्थापित होईल. दक्षिण आशियातील शाश्वत शांततेसाठी, 'संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार आणि लोकांच्या आकांक्षांनुसार काश्मीर प्रश्न लवकर सोडवणे आवश्यक आहे."

यावेळी त्यांनी काश्मीर प्रश्नासोबतच पाकिस्तान आणि भारत यांच्यात नुकत्याच झालेल्या लष्करी संघर्षाचाही उल्लेख केला. याविषयी बोलताना ते म्हणाले की, "जेव्हा कोणतेही संकट नसते, तेव्हा काश्मीरवर कधीच चर्चा होत नाही. पण, आम्ही नेहमी हा मुद्दा प्रत्येक स्तरावर मंडला आहे. काश्मीरच्या लोकांच्या आकांक्षा आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार काश्मीर वादाचे निराकरण केल्यावरच अनेक प्रश्न सुटतील."

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPakistanपाकिस्तानIndiaभारतPOK - pak occupied kashmirपीओके