जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशातील सैन्य अलर्ट आहेत. पाकिस्तान सैन्याकडून सलग ११ दिवस शस्त्राचे उल्लंघन केले आहेत. याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, आता पाकिस्तानने भारताची भीती घेतली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना भारताकडून हल्ल्याची भीती वाटते. ते म्हणाले की, भारत काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ कधीही लष्करी हल्ला करू शकतो.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमधील तणाव शिगेला पोहोचला असताना आसिफ यांचे हे विधान आले आहे. “भारत नियंत्रण रेषेजवळील कोणत्याही ठिकाणी हल्ला करू शकतो असे वृत्त आहे,” असे आसिफ यांनी सोमवारी इस्लामाबादमध्ये पत्रकारांना सांगितले. नवी दिल्लीला योग्य उत्तर दिले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय फायद्यासाठी या प्रदेशाला अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला.
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..."
खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमधील दहशतवादी कारवायांमध्ये नवी दिल्लीचा सहभाग असल्याचा आरोप ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा केला. 'आम्ही २०१६ आणि २०१७ मध्ये संयुक्त राष्ट्रांना पुरावे दिले होते, यात भारत दहशतवादाला निधी देत असल्याचे व्हिडीओ होते, असा दावा केला. दोन्ही प्रांतांमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या दहशतवादी घटना अफगाणिस्तानातून कार्यरत असलेल्या संघटनांनी घडवून आणल्या आणि त्यांना भारताकडून पाठिंबा मिळाल्याचा आरोप आसिफ यांनी केला. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांनी केली चौकशीची मागणी
संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले, "यात भारत सहभागी होता की काही अंतर्गत संघटना सहभागी होत्या हे तपासातून स्पष्ट होतील. तसेच, नवी दिल्लीच्या निराधार आरोपांमागील सत्य स्पष्ट होईल. गेल्या आठवड्यात, माहिती मंत्री अत्ता तरार यांनी सांगितले होते की भारताकडून संभाव्य हल्ल्याची शक्यता असल्याने पुढील २४-३६ तास महत्त्वाचे आहेत. वेळ निघून गेला आणि भारताकडून कोणतीही कारवाई झाली नाही. दरम्यान, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांनी सोमवारी पुन्हा एकदा सांगितले की पाकिस्तान आपल्या राष्ट्रीय प्रतिष्ठेचे आणि आपल्या लोकांच्या समृद्धीचे रक्षण करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल.