पाकिस्तान भारतावर नाही, तर अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता असलेले क्षेपणास्त्र बनविण्याच्या तयारीत; व्हाईट हाऊसमध्ये धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 08:21 IST2024-12-20T08:01:45+5:302024-12-20T08:21:26+5:30

पाकिस्तान एक नवीन क्षेपणास्त्र बनवण्याच्या तयारीत आहे, आता अमेरिकेने धोक्याचा इशारा दिला आहे.

Pakistan is preparing to build a missile capable of attacking America not India | पाकिस्तान भारतावर नाही, तर अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता असलेले क्षेपणास्त्र बनविण्याच्या तयारीत; व्हाईट हाऊसमध्ये धावपळ

पाकिस्तान भारतावर नाही, तर अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता असलेले क्षेपणास्त्र बनविण्याच्या तयारीत; व्हाईट हाऊसमध्ये धावपळ

पाकिस्तान नवीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्र बनवत आहे. या क्षेपणास्त्राबाबत अमेरिकेने इशारा दिला आहे. अमेरिकेने पाकिस्तानला जोरदार झटका देत चार कंपन्यांवर बंदी घातली आहे. त्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

अमेरिकेचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोनाथन फाइनर यांनी भीती व्यक्त केली. जोनाथन फाइनर म्हणाले,  'पाकिस्तान जे क्षेपणास्त्र बनवत आहे ते दक्षिण आशियाबाहेर अमेरिकेवर हल्ला करण्यात यशस्वी ठरेल. त्यामुळे पाकिस्तानच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे आणि त्यांना ही क्षमता मिळण्यापासून रोखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. जागतिक शांततेसाठी आयोजित केलेल्या एका संघटनेत बोलताना फिनर म्हणाले की, पाकिस्तान अमेरिकेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतो, असे वाटणे कठीण आहे, पण ते अमेरिकेसाठी धोका निर्माण करु शकते.

संसदेच्या आवारात घुमला ‘जय भीम’चा नारा; अमित शाह यांच्याविरोधात काँग्रेसची हक्कभंगाची नोटीस

लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्याच्या पाकिस्तानच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने गुरुवारी पाकिस्तानवर नवीन निर्बंध लादले. अण्वस्त्रधारी पाकिस्तानने लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र विकसित केल्यास ते जगासाठी धोकादायक ठरू शकते, असे अमेरिकेचे मत आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले, 'हे निर्बंध पाकिस्तानच्या राष्ट्रीय विकास संकुल आणि तीन कंपन्यांना लागू होतील. या निर्बंधांचा उद्देश मोठ्या प्रमाणात होणारी जीवितहानी रोखणे हा आहे. निर्बंध लागू झाल्यानंतर अमेरिकेतील बंदी घातलेल्या कॉम्प्लेक्स आणि कंपन्यांची मालमत्ता जप्त केली जाईल आणि त्यांना अमेरिकेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे व्यवसाय करता येणार नाही.

अमेरिकेत जाण्यासही निर्बंध

याप्रमाणे त्यांच्याशी संबंधित असलेले लोकही अमेरिकेला जाऊ शकणार नाहीत. NDC व्यतिरिक्त, अमेरिकेच्या निर्बंधांच्या कक्षेत आलेल्या तीन कंपन्यांची नावे एफिलिएट्स इंटरनॅशनल, अख्तर अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि रॉकसाइड एंटरप्राइझ आहेत. या तीन कंपन्या कराची येथील आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या माहितीनुसार, इस्लामाबादस्थित NDC लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या निर्मितीमध्ये गती देण्यासाठी आणि त्याच्या चाचणीसाठी आवश्यक उपकरणे मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये डेप्युटी NSA जोनाथन फाइनर, डेप्युटी सेक्रेटरी ऑफ स्टेट कर्ट एम कॅम्पबेल आणि भारतीय राजदूत विनय क्वात्रा यांच्यात झालेल्या बैठकीत मंगळवारी अमेरिकेने भारताला क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या निर्यातीशी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याचे संकेत दिले. बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, 'दोन्ही देशांच्या उद्योगांमध्ये नवीन संधी निर्माण करण्यासाठी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान निर्यातीच्या पुनरावलोकनाचे काम सुरू आहे. दोन देशांच्या कंपन्यांमध्ये अंतराळ यान प्रक्षेपणात सहकार्य करणे हा देखील त्याचा एक उद्देश आहे.

Web Title: Pakistan is preparing to build a missile capable of attacking America not India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.