कंगालीच्या वाटेवर असलेल्या Pakistan मध्ये लोकांचे हाल; उपचार महागले, औषधांचा तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 15:19 IST2023-03-28T15:17:17+5:302023-03-28T15:19:35+5:30

जीवरक्षक औषधांच्या किमती कल्पनेच्या बाहेर, सप्लायर्सनी पुरवठा केला बंद

Pakistan in deep trouble severe shortage of medicines life saving drugs in country as Pak facing biggest economic crisis | कंगालीच्या वाटेवर असलेल्या Pakistan मध्ये लोकांचे हाल; उपचार महागले, औषधांचा तुटवडा

कंगालीच्या वाटेवर असलेल्या Pakistan मध्ये लोकांचे हाल; उपचार महागले, औषधांचा तुटवडा

Pakistan, Shortage of Medicines: पाकिस्तानच्या आर्थिक संकटाच्या काळात, पाकिस्तानला जीवरक्षक औषधांचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. पाकिस्तानस्थित द न्यूज इंटरनॅशनलने स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. डॉलर आणि रुपयातील तफावत वाढल्यामुळे औषध पुरवठादारांनी त्यांचा पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही आरोग्य सुविधांना आयात केलेल्या लसी, कर्करोगावरील उपचार, प्रजननासंबंधी औषधे आणि ऍनेस्थेटीक वायूंचा तुटवडा जाणवत आहे.

वृत्त अहवालात फार्मासिस्ट अब्दुल मन्नानच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, ड्रग रेग्युलेशन अथॉरिटी ऑफ पाकिस्तान (DRAP) च्या किंमत धोरणामुळे अनेक जीवनरक्षक औषधे पाकिस्तानमध्ये उपलब्ध नाहीत.

'औषधांच्या किमती अनेक पटींनी वाढल्या'

मन्नान म्हणाले, "डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची तीव्र घसरण आणि ड्रग रेग्युलेशन अथॉरिटी ऑफ पाकिस्तान (DRAP) च्या वादग्रस्त औषधांच्या किंमती धोरणामुळे, औषधांच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत आणि आयातदारांकडून ते खाली आणणे अनैतिक आहे. त्यामुळे सध्याच्या किमतींनुसार उपचार करणे अव्यवहार्य झाले आहे." मन्नान यांनी सरकारला DRAP च्या 2018 च्या औषध किमती धोरणाचा ताबडतोब आढावा घेण्याचे आवाहन केले आहे. ते धोरण हार्डशिप श्रेणी अंतर्गत किमतीत वाढ करण्यास परवानगी देते. त्यांनी असा दावा केला की DRAP ने औषधे आयात करण्यास परवानगी दिली, जेव्हा ते डॉलरच्या तुलनेत 190 रुपयांना उपलब्ध होते. परंतु आता त्याची किंमत वाढली आहे. आता त्याची किंमत 285 रुपये इतकी पोहोचल्याने स्थानिक बाजारात डॉलरच्या तुलनेत ही किंमत 300 रुपयांवर गेली आहे.

पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात

पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांतील सर्वात भीषण आर्थिक संकटातून जात आहे. चलनवाढीचा दर 30 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. पाकिस्तान सरकार सहसा रमजानच्या महिन्यात मदत पॅकेजेस जाहीर करते, परंतु या वर्षी अडचणीत असलेल्या सरकारकडे रोखी फारच कमी आहेत. वाढत्या महागाईने देशातील लोकांचे जीवन अत्यंत दयनीय बनले आहे, कारण ते आता औषधांसह मूलभूत सुविधा खरेदीसाठीही कसरत करताना दिसत आहेत.

Web Title: Pakistan in deep trouble severe shortage of medicines life saving drugs in country as Pak facing biggest economic crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.