शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan Imran Khan Arrest: पाकिस्तानात फुल-ऑन ड्रामा! माजी PM इम्रान खान यांना अटक करायला आले पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 18:33 IST

इस्लामाबादच्या रॅलीमध्ये समर्थकांनी लाठ्या-काठ्यांनी अडवला पोलिसांचा ताफा

Pakistan Imran Khan Arrest: पाकिस्तानच्या राजकारणात सध्या माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी वाढत आहेत. त्यांना अटक करण्यासाठी आज पोलीस त्यांच्या घरी पोहोचले. मात्र समर्थकांनी मोठा जमाव जमवून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हे सर्वजण लाठ्या-काठ्या घेऊन पोलिसांसमोर उभे ठाकले आहेत. तोशाखाना प्रकरणात एका महिला न्यायाधीशांना धमकावल्याबद्दल आणि कोर्टात हजर न राहिल्याबद्दल इम्रान खानविरोधात दोन अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याच्यावर अनेक दिवसांपासून अटकेची टांगती तलवार आहे. काल इस्लामाबाद पोलीस हेलिकॉप्टरमधून इम्रानना अटक करण्यासाठी पोहोचले होते. पण अत्यंत हुशारीने इम्रान यांनी घर सोडले आणि थेट रॅलीला संबोधित करण्यासाठी गेले. त्यामुळे समर्थकांच्या गर्दीत माजी पंतप्रधानांना पकडणे पोलिसांना अवघड झाले होते.

त्यानंतर, आता मंगळवारी पुन्हा पोलीस त्याच प्रयत्नात आहेत. इम्रानला काहीही करून अटक करायची असा पोलिसांचा मानस होता. मात्र समर्थकांनी पोलिसांचा मार्ग अडवला आहे. अनेक तरुण हातात काठ्या घेऊन आपल्या नेत्याच्या संरक्षणात उभे राहिले आहेत. या समर्थनावर मरियम नवाज शरीफ यांनी म्हटले आहे की, जर कोणी पोलीस जखमी झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी इम्रान खान यांची असेल. यावेळी पोलीस आणि समर्थक दोघेही समोरासमोर उभे आहेत. मोठा हिंसाचार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काही समर्थकांच्या प्रकरणाबाबत बोलताना माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी इस्लामाबाद येथील जिल्हा न्यायालयाच्या सत्र न्यायाधीश झेबा चौधरी यांना धमकी दिली असल्याचे प्रकरण आहे. इम्रान खान यांनी महिला न्यायाधीश जेबा चौधरी यांना धमकीच्या स्वरात भेटण्यास सांगितले असल्याचा आरोप करण्यात आला. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानArrestअटकPoliceपोलिस