शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का, १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 13:20 IST

Imran Khan Jail: पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने ठोठवली शिक्षा

Imran Khan Shah Mahmood Qureshi sentenced to 10 years in jail in cipher case: पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. गोपनीय डिप्लोमॅटिक केबल्स (सायफर) लीक करणे आणि गुप्तता कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या विशेष न्यायालयानेइम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी या दोघांना १० वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. पाकिस्तानातील विशेष न्यायालयाने आज या संदर्भातील निर्णय दिला. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांना दोषी ठरवण्यात आले होते. हे प्रकरण एका डिप्लोमॅटिक दस्तऐवजाशी संबंधित असून ते दस्तऐवज इम्रान खान यांच्याकडून कथितपणे गायब झाले होते.

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) आरोप केला आहे की, दस्तऐवजात अमेरिकेने इम्रान खान यांना पदावरून हटवण्याची धमकी दिली होती. इम्रान खान यांना ५ ऑगस्टला तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने २९ ऑगस्टला त्यांची शिक्षा स्थगित केली होती, परंतु Cipher प्रकरणात न्यायालयीन कोठडी असल्यामुळे ते तुरुंगातच होते. यादरम्यान, ३० सप्टेंबर रोजी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये कुरेशी यांचे सायफर प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून नाव देण्यात आले होते.

Cipher केस म्हणजे काय?

इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांच्याविरुद्धचा हा सायफरचा खटला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. इम्रान खान यांच्यावर सर्वोच्च गुप्त माहितीचा वैयक्तिक वापर केल्याचा आरोप आहे. सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर इम्रान यांनी आपल्या हकालपट्टीमागे अमेरिका हात असल्याचा आरोप केला होता. यासाठी वॉशिंग्टनमधील पाकिस्तानी दूतावासाने त्यांना एक केबल (टेप किंवा गुप्त माहिती) पाठवल्याचे इम्रानने सांगितले. इम्रान खान यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी वादग्रस्त मुत्सद्दी संभाषण सार्वजनिक केले होते. त्याला ‘Cipher’ असे म्हणतात.

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. गोपनीय डिप्लोमॅटिक केबल्स (सायफर) लीक करणे आणि गुप्तता कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी या दोघांना १० वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. पाकिस्तानातील विशेष न्यायालयाने आज या संदर्भातील निर्णय दिला. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांना दोषी ठरवण्यात आले होते. हे प्रकरण एका डिप्लोमॅटिक दस्तऐवजाशी संबंधित असून ते दस्तऐवज इम्रान खान यांच्याकडून कथितपणे गायब झाले होते.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानjailतुरुंगCourtन्यायालयPakistanपाकिस्तान