शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

UNHRC मध्ये पाकिस्तान पुन्हा तोंडघशी, काश्मीरबाबत प्रस्ताव पारित करण्यात आले अपयश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 12:14 IST

भारताने काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान काश्मीर प्रश्नाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र...

जिनिव्हा - भारताने काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान काश्मीर प्रश्नाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काश्मिरप्रश्नावरून त्याला वारंवार नामुष्की झेलावी लागत आहे. आता संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसमोर काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला आहे. काश्मीरमधील कथित मानवाधिकारांच्या उल्लंघनावरून भारताविरोधात प्रस्ताव आणण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. जिनेव्हा येथे सुरू असलेल्या 42 व्या मानवाधिकार सेशनमध्ये पाकिस्तानला भारताविरोधात प्रस्ताव आणण्यासाठी अन्य देशांचा आवश्यक प्रमाणात पाठिंबा मिळाला नाही. भारताच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवर हा मोठा विजय आहे. दरम्यान, काश्मीरमधून कलम 370 हटवणे ही आपली अंतर्गत बाब असे भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक ठिकाणी स्पष्ट केलेले आहे.  दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसमोर पाकिस्ताने गुरुवारी रात्री भारताविरोधात दाखल केलेल्या मानवाधिकार हननाच्या प्रस्तावाला पुरेसे समर्थन मिळू शकले नाही. अगदी मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनकडूनही पाकिस्तानला पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आणि काश्मीर प्रश्न हा आपला अंतर्गत प्रश्न असल्याच्या करण्यात येत असलेल्या दाव्याचा मोठा विजय मानला जात आहे.   संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमध्ये एकूण 47 देशांनी सहभाग घेतला आहे. या परिषदेत भारतही आपली बाजू भक्कमपणे मांडत आहे. या परिषदेत भारतीय पथकाचे नेतृत्व अजय बिसारिया करत आहेत. बिसारिया यांनी पाकिस्तानमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून सुद्धा काम पाहिले आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत भारताविरोधात प्रस्ताव आणण्यात अपयश आल्याने काश्मीर प्रश्नावरून आंतरराष्ट्रीय समुदायाचा आपल्याला पाठिंबा असल्याचा पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेला दावा खोटा ठरला आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ