शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, सायफर प्रकरणात दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 16:44 IST

हे प्रकरण एका डिप्लोमॅटिक दस्तऐवजाशी संबंधित आहे, जे इम्रान खान यांच्याकडून कथितपणे गायब झाले होते. 

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. गोपनीय डिप्लोमॅटिक केबल्स (सायफर) लीक करणे आणि  गुप्तता कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका विशेष न्यायालयाने सोमवारी इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना दोषी ठरवले. हे प्रकरण एका डिप्लोमॅटिक दस्तऐवजाशी संबंधित आहे, जे इम्रान खान यांच्याकडून कथितपणे गायब झाले होते. 

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) आरोप केला आहे की, दस्तऐवजात अमेरिकेने इम्रान खान यांना पदावरून हटवण्याची धमकी दिली होती. इम्रान खान यांना ५ ऑगस्टला तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने २९ ऑगस्टला त्यांची शिक्षा स्थगित केली होती, परंतु सायफर प्रकरणात न्यायालयीन कोठडी असल्यामुळे ते तुरुंगातच होते. यादरम्यान, ३० सप्टेंबर रोजी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये कुरेशी यांचे सायफर प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून नाव देण्यात आले होते.

पीटीआयच्या दोन्ही नेत्यांना १७ ऑक्टोबरला दोषी ठरवण्यात येईल, असा निर्णय न्यायालयाने दिला होता. मात्र, गेल्या आठवड्यात न्यायालयाने सुनावणी २३ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली होती. रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात सोमवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अबुअल हसनत जुलकरनैन यांनी सुनावणी घेतली. न्यायालयाने या प्रकरणाची औपचारिक सुनावणी सुरू केली आणि २७ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणीसाठी साक्षीदारांना बोलावले.

एफआयएचे विशेष वकील शाह खवर म्हणाले की, आजची सुनावणी आरोपासाठी होती. खुल्या न्यायालयात दोषारोपाचे वाचन करण्यात आले. आरोप जाहीर करताना पीटीआयचे दोन्ही नेते उपस्थित होते आणि पुढील कार्यवाही २७ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्या दिवशी साक्षीदारांना हजर केले जाणार आहे. दरम्यान, इम्रान खान यांचे वकील उमैर नियाझी यांनी सांगितले की, इम्रान खान यांनी गुन्हा नाकारला आहे. न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान