शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

Pakistan Economic Crisis : ‘तुमचं संरक्षण बजेट कमी करा,’ IMF नं पॅकेज देण्यापूर्वी पाकिस्तानसमोर ठेवली मोठी अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 18:24 IST

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असलेला पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी (IMF) मदत पॅकेजसाठी बोलत आहे. दोघांमधील तांत्रिक पातळीवरील चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाली आहे.

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असलेला पाकिस्तान मदत पॅकेजसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी (IMF) चर्चा करत आहे. रिपोर्ट्सनुसार, दोघांमधील तांत्रिक स्तरावरील चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. दरम्यान, IMF ने पाकिस्तानसमोर काही नवीन अटींची पूर्तता करण्याची मागणी केली आहे. त्यात संरक्षण बजेट कमी करण्याच्या अटीचाही समावेश आहे. आयएमएफ आता आर्थिक स्तरावरील बदलांची संपूर्ण यादी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना सादर करेल, त्यानंतर पुढील आठवड्यात दोघांमध्ये धोरणात्मक स्तरावर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

9 फेब्रुवारीपर्यंत पाकिस्तान आणि आयएमएफ या दोघांमध्ये पाकिस्तानची अर्थव्यवस्था कशी सुरळीत करायची यावर एकमत झाले तर दोन्ही बाजू या करारावर स्वाक्षरी करतील. जिओटीव्हीच्या वृत्तानुसार पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडे सादर केलेली आकडेवारी देशाची आर्थिक स्थिती एका खोल संकटाकडे निर्देश करते. पाकिस्तानने नोंदवले आहे की त्यांचा जीडीपी ग्रोथ 5 टक्क्यांवरून कमी होऊन 1.5 टक्के ते 2 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची अंदाज आहे. त्याच वेळी, महागाईचा दर चालू वर्षात 12.5 टक्क्यां​​वरून 29 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. 

पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनीही अलीकडेच देशातील जनतेला 'कठीण काळासाठी' तयार राहण्याचा इशारा दिला आहे कारण त्यांचे सरकार आयएमएफच्या अटी पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत आहे. दिवाळखोरी टाळण्यासाठी 6 अब्ज डॉलरच्या बेलआउट पॅकेज अंतर्गत पाकिस्तान IMF कडून 1.1 अब्ज डॉलर्सचा हप्ता मागत आहे. बेलआउट पॅकेजसाठी IMF सोबत 31 जानेवारीपासून नवीन चर्चा सुरू झाली.

काय आहेत अटी?

  • संरक्षण बजेटमध्ये हळूहळू कपात करणं.
  • ग्रेड 17 ते 22 च्या वरिष्ठ प्रशासकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची घोषणा.
  • उत्पादन शुल्क वाढवून सुमारे 25-30 अब्ज रुपयांचे भांडवल उभारणे.
  • बँकांच्या परकीय चलनाच्या कमाईवर कर लावून 20 अब्ज रुपये उभारणे.
  • 3 टक्के फ्लड सेस लावून 60 अब्ज रुपये उभे केले जाऊ शकतात.
  • सॉफ्ट ड्रिंक्सवरील केंद्रीय उत्पादन शुल्क वाढवून 60 अब्ज रुपयांपर्यंत वाढ होईल.
  • रिटर्न न भरणाऱ्यांच्या बँक व्यवहारांवर बंदी आणून 45 अब्ज रुपये मिळतील.
  • मालमत्ता खरेदी आणि विक्रीवरील ॲडव्हान्स्ड टॅक्समधून 20 ते 30 अब्ज रुपये उभारणे.
  • परदेशातून आयात केलेल्या आणि देशात असेंबल केलेल्या वाहनांवर कॅपिटल व्हॅल्यू टॅक्स लादून 10 अब्ज रुपयांची उभारणी करणे.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानEconomyअर्थव्यवस्था