शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan Economic Crisis : “भारतीय iPhone साठी, आपण मोफत रेशनसाठी लाईनमध्ये,” देशातील परिस्थितीवर भडकले पाकिस्तानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 15:01 IST

पाकिस्तानातील लोकांनी भारताचं कौतुक करत त्याठिकाणी गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण असल्याचं म्हटलं.

ॲपलनं या महिन्यात भारतातील मुंबई आणि दिल्ली या दोन शहरांमध्ये आपली स्टोअर्स सुरू केली. ॲपलचे सीईओ टीम कुक यांनी स्वत: भारतात येऊन या स्टोअर्सचं उद्घाटन केलं. उद्घाटनावेळी दोन्ही स्टोअर्सवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सोशल मीडियावर अनेक फोटोही व्हायरल झाले होते. तसंच टिम कुक लोकांसोबत फोटोही काढताना दिसले होते. भारतातील ॲपल स्टोअर्सबाबत पाकिस्तानातूनही प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानी लोकांचं म्हणणं आहे की, भारतातील लोक ॲपल स्टोअर्सबाहेर रांगेत उभे आहेत, तर पाकिस्तानातील लोकांना मोफत रेशनसाठी लांबच लांब रांगेत उभं राहावं लागत आहे.पाकिस्तानात पुन्हा सत्तापालट होणार? माजी पंतप्रधान म्हणाले, “आम्ही संविधान ट्विस्ट केलं…”

भारतात गुंतवणूकदारांसाठी अनुकूल वातावरण असल्याचं म्हणत पाकिस्तानी युझर्सनं भारताचं कौतुकही केलं. पाकिस्तानला भारताशी तुलना करण्याचा अधिकार राहिलेला नाही. आम्ही भारताच्या तुलनेत कुठेही उभं राहू शकत नाही. पाकिस्तानच्या नेत्यांनी केवळ भारताविरोधात संरक्षण बजेटच्या नावाखाली संपत्ती जमा केल्याचा आरोप एका युझरनं केलाय. “भारतीय लोक मुंबईत ॲपलचे पहिलं स्टोअर सुरू झाल्याचा आनंद साजरा करत आहेत आणि पाकिस्तान आपल्या प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची किंवा देशाच्या चलनाची, अगदी संस्थांचीही काळजी घेऊ शकत नाही,” असं म्हणत एका युझरनं टीकेचा बाण सोडला.  एकीकडे मुंबईत आहे जिकडे ॲपल स्टोअरच्या बाहेर लोक रांगा लावून उभे आहेत, तर दुसरीकडे पाकिस्तान आहे, जिकडे शेकडो लोक मोफत रेशनसाठी रांगेत उभे आहेत, असं म्हणत आणखी एका युझरनं जोरदार टीका केली.

पाकिस्तानात विदेशी असुरक्षितपाकिस्तानात चिनी नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या वर्षी कराची युनिव्हर्सिटीत झालेल्या हल्ल्यात तीन चिनी नागरिकांचा मृत्यू झाला होता. स्वीडननंही याच महिन्यात इस्लामाबादमधील आपलं दुतावास सुरक्षेच्या कारणास्तव बंद केलं. दुतावास अनिश्चित काळासाठी बंद केलं जात असून कर्मचाऱ्यांची सुरक्षा आमचं प्राधान्य असल्याचं त्यांनी एका निवेदनाद्वारे सांगितलं होतं.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतApple IncअॅपलEconomyअर्थव्यवस्था