शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरप्रश्नी सर्वत्र तोंडघशी पडलेल्या पाकिस्तानचा अमेरिकेच्या वक्तव्यावरून तिळपापड, म्हटलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 15:58 IST

Pakistan on Jammu Kashmir : अमेरिकेच्या जम्मू काश्मीरबाबतच्या वक्तव्यावर पाकिस्ताननं घेतला आक्षेप

ठळक मुद्देअमेरिकेच्या जम्मू काश्मीरबाबतच्या वक्तव्यावर पाकिस्ताननं घेतला आक्षेपपाकिस्तानच्या आक्षेपानंतरही अमेरिकेकडून कोणतेही बदल नाहीत

काश्मीरप्रश्नी पाकिस्तानला अनेकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर तोंडघशी पडावं लागलं आहे. दरम्यान, काश्मीरबद्दल अमेरिकेच्या एका वक्तव्यावरून पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. काश्मीरप्रश्नी अमेरिकेच्या वक्तव्यावरून पाकिस्तानचा संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेनं केलेल्या एका ट्वीटमधघ्ये जम्मू काश्मीर हा वादग्रस्त भाग असल्याचा उल्लेख न केल्याचं सांगत पाकिस्ताननं त्यावर आक्षेप घेतला आहे. अमेरिकेनं गुरूवारी एक ट्वीट केलं होतं. यामध्ये त्यांनी जम्मू काश्मीरबद्दल आपल्या धोरणांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं म्हटलं होतं. "आम्ही जम्मू काश्मीरमध्ये ४ जी इंटरनेट सुविधा सुरू करण्याच्या निर्णयाचं स्वागत करतो. हे स्थानिकांसाठी उचलण्यात आलेलं एक उत्तम पाऊल आहे. या क्षेत्रातील परिस्थिती सामान्य ठेवण्यासाठी राजकीय आणि आर्थिक प्रगती कायम राहिल अशी आम्ही आशा करतो," असं ट्वीट अमेरिकेनं केलं होतं. अमेरिकेच्या या ट्वीटमध्ये जम्मू काश्मीर हा वादग्रस्त भाग असा उल्लेख न करण्यावर पाकिस्ताननं आक्षेप घेतला. "अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या ट्वीटमध्ये ज्याप्रकारे काश्मीरचा उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे पाकिस्तान निराशा झाली आहे. काश्मीरचा वादग्रस्त क्षेत्र असा उल्लेख न करणं हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे प्रस्ताव आणि आंतरराष्ट्रीय समुदायांच्या विरोधातील आहे," असं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जाहिर चौधरी यांनी म्हटलं आहे. काश्मीरबाबत अमेरिकेच्या धोरणात कोणताही बदल होणार नाही, असं अमेरिकेते परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सांगितलं. परंतु पाकिस्तानच्या आक्षेपानंतरही ट्वीटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना एक आवाहन केलं होतं. काश्मीरचं सत्य बायडनं प्रशासनानं दुर्लक्षित करू नये असंही त्यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरAmericaअमेरिकाTwitterट्विटर