पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 14:58 IST2025-11-03T14:01:28+5:302025-11-03T14:58:18+5:30
Donald Trump News: पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि नंतर भारताने पाकिस्तानविरोधात राबवलेलं ऑपरेशन सिंदूर यामुळे सध्या दक्षिण आशियामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका दाव्यामुळे हा तणाव आखणी वाढण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि नंतर भारताने पाकिस्तानविरोधात राबवलेलं ऑपरेशन सिंदूर यामुळे सध्या दक्षिण आशियामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका दाव्यामुळे हा तणाव आखणी वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने हल्लीच अणुचाचणी केली आहे. तसेच सातत्याने अणुचाचण्या करणाऱ्या देशांच्या यादीत आता पाकिस्तानचा समावेश झाला आहे, असा सनसनाटी दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
एका अमेरिकन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, पाकिस्तानने हल्लीच अणुचाचणी केली आहे. आता पाकिस्तान हा सातत्याने आणि उघडपणे अणुचाचण्या घेणाऱ्या देशांच्या यादीमध्ये समाविष्ट झाला आहे. या देशाच्या अशा वर्तनामुळे अमेरिकेसाठीही पुन्हा एकदा अणुचाचण्या सुरू करणं आवश्यक बनलं आहे. इतर अनेक देश अणुचाचण्या करणार असतील तर अमेरिकाही आता अणुचाचण्या सुरू करेल, असे अमेरिकेने पाकिस्तानचा उल्लेख करत सांगितले.
सुमारे तासभर चाललेल्या या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की, रशिया आणि चीन अणुचाचण्या करत आहेत. मात्र ते याबाबत काही बोलत नाहीत. एवढंच नाही तर पाकिस्तानसुद्धा अणुचाचण्या करत आहे. मात्र आम्ही अमेरिकन एक खुल्या समाजासारखे आहोत. आम्ही याबाबत बोलतो. तसेच आता याबाबत बोलण्याची वेळ आली आहे. मात्र आम्ही सर्वांना सांगून उघडपणे अणुचाचणी करू. कारण इतर लोक लपून छपून अणुचाचण्या करतात, असा टोलाही डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेली लगावला.