शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 08:53 IST

पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी कबुली दिली आहे.

Operation Sindoor: पहलगाम हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानचा चेहरा जगासमोर आला. आता पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरबद्दल मोठी कबुली दिली आहे.  भारताने नूरखान आणि शोरकोट हवाई तळांवर आणि इतर ठिकाणी हल्ला केल्यानंतर आम्ही युद्धबंदीला सहमती दर्शवल्याचे पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनी कबूल केले आहे. युद्धबंदींच्या प्रश्नावर इशाक दार यांनी सौदी अरेबियाचे प्रिन्स फैसल यांचाही उल्लेख केला.

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानातील नऊ मोठमोठे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये काही भारतीयांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतानेही पाकिस्तानला प्रत्युत्तर देत हल्ला केला. मात्र मोठ्या प्रमाणात  नुकसान झाल्याने पाकिस्तानने संघर्ष थांबवण्याची विनंती भारताकडे केली.

ऑपरेशन सिंदूरमुळे अणुबॉम्ब हल्ल्याची धमक्या देणाऱ्या पाकिस्तानला भारतासमोर गुडघे टेकावे लागले आणि युद्धबंदीची विनंती करावी लागली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफपासून मुल्ला मुनीरपर्यंत सर्वांनी ते मान्य केले आहे. आता पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनीही युद्धबंदीची विनंती पाकिस्ताननेच केल्याची कबुली दिली. या युद्धबंदीसाठी पाकिस्तानने अमेरिकाच नाही तर सौदी अरेबियाचीही मदत घेतली होती.

"भारताने रावळपिंडीतील नूर खान आणि शोरकोट हवाई तळांवर हल्ला केला. यामुळे पाकिस्तानचा बदला घेण्याची योजना उध्वस्त झाली. भारताच्या हल्ल्याच्या ४५ मिनिटांतच सौदी राजकुमार फैसल बिन सलमान यांनी त्यांना फोन करून विचारले की, मी जयशंकर यांच्याशी बोलून पाकिस्तान युद्धबंदीसाठी तयार आहे हे सांगू का? मी लगेच यावर सहमती दर्शवली आणि हो म्हटले, कृपया जयशंकर साहेबांना फोन करा आणि त्यांना सांगा की आम्हाला युद्धबंदी हवी आहे," असं  इशाक दार यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं.

दरम्यान, भारत व पाकिस्तानमधील दोन अत्यंत बुद्धिमान नेत्यांमुळे मागील महिन्यात दोन्ही देशांतील संघर्ष थांबला, असा गौप्यस्फोट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. मात्र, ते नेते कोण हे ट्रम्प यांनी स्पष्ट केले नाही. संघर्ष थांबविण्यासाठी केलेल्या कामगिरीमुळेच मुनीर यांना व्हाइट हाउसमध्ये खास मेजवानी दिली, असेही ट्रम्प म्हणाले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndiaभारतS. Jaishankarएस. जयशंकर