शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

पाकिस्तानात हिंदूंची दुकाने जाळली, मालमत्तेच्या हानीची सरकार भरपाई करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 3:50 AM

अल्पसंख्य हिंदू समाजाच्या डॉक्टरने पवित्र ग्रंथाची पाने फाडून त्यात औषधी गुंडाळून दिल्याच्या कथित घटनेनंतर जमावाने हिंदूंच्या मालकीची दुकाने पेटवून दिली.

कराची : अल्पसंख्य हिंदू समाजाच्या डॉक्टरने पवित्र ग्रंथाची पाने फाडून त्यात औषधी गुंडाळून दिल्याच्या कथित घटनेनंतर जमावाने हिंदूंच्या मालकीची दुकाने पेटवून दिली. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात ही कथित ईशनिंदा घडली असून, आरोपी डॉक्टर रमेश कुमार याला देशाच्या अतिशय कठोर अशा ईशनिंदा प्रतिबंधक कायद्याखाली सोमवारी अटक करण्यात आली.व्यवसायाने जनावरांचा डॉक्टर असलेल्या रमेश कुमार याच्याविरुद्ध पोलिसांकडे स्थानिक मौलवीने तक्रार केल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पाकिस्तानात इस्लामचा अपमान करणाऱ्याला ईशनिंदा कायद्याखाली मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते. पोलिसांनी डॉक्टरला ताब्यात घेतले तेव्हा संतप्त जमावाने हिंदूंच्या मालकीच्या दुकानांना पेटवून दिले आणि सिंध प्रांतातील फुलाद्योन गावातील (जिल्हा मिरपूरखास) रस्त्यावर टायर जाळले, असे वृत्त एक्स्प्रेस ट्रिब्यूनने दिले.जमावाने रमेश कुमार याच्या मालकीचा दवाखाना आणि हिंदूंच्या मालकीचे औषधाचे दुकान व इतर दोन दुकाने पेटवून दिली. टायर्स जाळून जमावाने रस्तेही अडवून टाकले होते. निदर्शकांनी काही दुकानेही लुटल्याचे वृत्त आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून स्थानिक अधिकाऱ्यांनी निमलष्करी तुकडी मागवली. दंगलींत भाग घेणाºयांवर पोलिसांनी गुन्हेही दाखल केले आहेत. ‘घटना दुर्दैवी आहे. आम्ही डॉक्टरला ताब्यात घेतले असून, घटनेची चौकशी केली जात आहे’, असे मिरपूरखासचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक जावेद बलोच यांनी सांगितले. बलोच म्हणाले, ‘गुन्हा दाखल झाला असून, अनुचित घटना टाळण्यासाठी गावात आम्ही तळ टाकला आहे. परिस्थिती आता सामान्य आहे’. हिंदू समाजाच्या मालमत्तेची नासधूस करणाºयांवर आम्ही कारवाई करू.मालमत्तेची नासधूस केल्याच्या आरोपावरून आम्ही काही संशयितांना स्थानबद्ध केल्याचेही बलोचम्हणाले.हिंसाचारात ज्यांच्या मालमत्तेची हानी झाली त्यांना सरकार भरपाई देईल, असे मिरपूरखासच्या उपायुक्तांनी सांगितले.