Pakistan ceasefire violations in India Jammu Kashmir Blackout: पाकिस्तानने अवघ्या चार तासांत युद्धबंदीचा भंग केला. भारत आणि पाकिस्तानमधील ८६ तास चाललेले युद्ध शनिवारी संध्याकाळी ५ वाजता संपले होते. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली होती, पण त्यानंतर अवघ्या ४ तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरमध्ये सीमेपलीकडून पाकिस्तानच्या कारवाया पुन्हा एकदा तीव्र झाल्या आहेत. शनिवारी रात्री पाकिस्तानने अनेक भागात युद्धबंदीचे उल्लंघन केले आणि जोरदार गोळीबार केला, तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात एका संशयित ड्रोनचा स्फोटही झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने अखनूर, राजौरी आणि आरएस पुरा आंतरराष्ट्रीय सीमेवर तोफखाना डागला आहे. त्याचवेळी बारामुल्लामध्ये ड्रोन हल्ला झाला आहे. जम्मूच्या पालनवाला सेक्टरमध्येही पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आहे. ही माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, आज दुपारी ३.३५ वाजता दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा झाली. दोन्ही देशांनी संध्याकाळी ५ वाजल्यापासून हवेत, पाण्यातून आणि जमिनीवरून होणारे हल्ले तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज. यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. १२ मे रोजी दोन्ही देशांचे अधिकारी पुढील रणनीतीवर चर्चा करतील, असे मिस्री म्हणाले. पण आता पुन्हा एकदा पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने गोळीबार सुरु आहे आणि सायरन वाजवले जात आहेत.
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही यावर ट्विट करत शस्त्रसंधीचे काय झाले असा संतप्त सवाल केला आहे.