Pakistan Balochistan Attack : बलुचिस्तानात पोलिसांच्या व्हॅनवर हल्ला, ९ जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 06:00 IST2023-03-07T06:00:31+5:302023-03-07T06:00:46+5:30
पाकिस्तानात सुरक्षा कर्मचाऱ्यांवरील हल्ले सुरूच असून, ताजी घटना बलुचिस्तान प्रांतामध्ये सोमवारी घडली.

Pakistan Balochistan Attack : बलुचिस्तानात पोलिसांच्या व्हॅनवर हल्ला, ९ जण ठार
कराची : पाकिस्तानात सुरक्षा कर्मचाऱ्यांवरील हल्ले सुरूच असून, ताजी घटना बलुचिस्तान प्रांतामध्ये सोमवारी घडली. एका आत्मघाती हल्लेखोराने त्याची दुचाकी पोलिस व्हॅनवर धडकवून स्फोट घडवून आणला. यात नऊ पोलिस ठार तर अन्य १३ जण जखमी झाले.
बलुचिस्तान पोलिस दलाची व्हॅन बोलन परिसरातील डोंगराळ भागातून जात होती. तेव्हा हल्लेखोराने स्फोटके लादलेली दुचाकी व्हॅनवर धडकवली. हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की, व्हॅन जागेवरच उलटली.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी, बॉम्बशोधक पथक आणि सुरक्षा दलांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस कर्मचारी सिबी येथून क्वेटाला परतत असताना हा हल्ला झाला, असे वरिष्ठ पोलिस अधीक्षक महमूद नोटेझाई यांनी सांगितले.