शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भारतावर आरोप करणारं पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटलं! आत्मघाती हल्लेखोर निघाला कुणीतरी वेगळाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 15:50 IST

Pakistan Islamabad Blast Updates: पाकिस्तानच्या मशिदीतील आत्मघाती बॉम्बहल्ल्याचा मास्टरमाईंडसह तिघांना अटक

Pakistan Islamabad Blast Updates: पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी इस्लामाबादमधील मशिदीवर झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि त्याच्या ३ साथीदारांना अटक केली आहे. हा स्फोट इस्लामाबादमधील तलाई (Tarlai) भागात असलेल्या 'खदिजा अल-कुबरा' मशिदीत जुम्म्याची नमाज सुरू असताना झाला होता. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या भीषण हल्ल्यात ३१ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर १६९ हून अधिक लोक जखमी झाले होते.

मास्टरमाइंडची ओळख

पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी जाहीर केले की, अटक करण्यात आलेल्या ४ संशयितांपैकी एक अफगाण नागरिक असून तोच या संपूर्ण हल्ल्याचा मास्टरमाइंड (सूत्रधार) आहे. इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. सुरक्षा दलांनी रात्रभर राबवलेल्या शोधमोहिमेनंतर या दहशतवाद्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी गेलेल्या सुरक्षा दलांवर आरोपींनी गोळीबार केला, ज्यामध्ये एक पाकिस्तानी पोलीस अधिकारी शहीद झाला असून तीन जण जखमी झाले.

पाकचा आरोप, भारताचे सडेतोड प्रत्युत्तर

तपासात असे समोर आले आहे की, आत्मघाती हल्लेखोर हा पाकिस्तानी नागरिक होता, परंतु त्याने नुकताच अफगाणिस्तानचा दौरा केला होता, जिथे त्याला प्रशिक्षणासह रसद पुरवण्यात आली होती. या घटनेनंतर पाकिस्तानने नेहमीप्रमाणे कोणताही पुरावा न देता भारतावर आरोप करण्याचा प्रयत्न केला होता, ज्याचा भारताने सडेतोड उत्तर देत तीव्र निषेध केला. भारताने स्पष्ट केले की, पाकिस्तानने आपल्या अंतर्गत समस्यांसाठी इतरांना दोष देण्याऐवजी स्वतःच्या भूमीवरील दहशतवादाचा नायनाट करावा.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan's blame game backfires; Afghan mastermind exposed in blast.

Web Summary : Pakistan's attempt to blame India for a mosque attack backfired. An Afghan national was identified as the mastermind behind the Islamabad bombing. Security forces arrested him and three others after a raid. India strongly condemned Pakistan's baseless accusations.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानBlastस्फोटIndiaभारतAfghanistanअफगाणिस्तानISISइसिस