पाकिस्तानी सैन्याचा चीनसोबत डबल गेम; भडकलेल्या जिनपिंगनी दौराच रद्द केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 16:54 IST2025-04-09T16:53:41+5:302025-04-09T16:54:42+5:30

Pakistan China Tension: पाकिस्तानी सैन्य चीनसोबत डबलगेम खेळत आहे. खैबर पख्तूख्वा भागात दुर्मिळ खनिज साठे मिळाले आहेत. चीन या भागात त्याचा शोध घेत आहे.

Pakistan Army's double game with China; Angry Jinping cancels visit after america entry in mining | पाकिस्तानी सैन्याचा चीनसोबत डबल गेम; भडकलेल्या जिनपिंगनी दौराच रद्द केला

पाकिस्तानी सैन्याचा चीनसोबत डबल गेम; भडकलेल्या जिनपिंगनी दौराच रद्द केला

टेरिफ वॉरने शत्रू देशांना मित्र बनविण्यास सुरुवात केली आहे तर मित्र देशांना शत्रू बनविण्यास सुरुवात केली आहे. टेरिफ वॉरमुळे अमेरिका आणि चीनमध्ये मोठी स्पर्धा सुरु झालेली आहे. अशातच पाकिस्तान आणि चीनमधील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. नुकतीच अशी मोठी घटना घडली असून चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी त्या रागातून आपला पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. 

पाकिस्तानी सैन्य चीनसोबत डबलगेम खेळत आहे. खैबर पख्तूख्वा भागात दुर्मिळ खनिज साठे मिळाले आहेत. चीन या भागात त्याचा शोध घेत आहे. परंतू पाकिस्तानी सैन्याने या खनिजांचे साठे हाती लागताच चीनला बाजुला करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. यामुळे पाकिस्तानवर चीन नाराज झाला आहे. चीनने अब्जावधी डॉलर पाकिस्तानमध्ये गुंतविलेले आहेत. कोबाल्ट सारखी खनिजे तिथे सापडत आहेत. अमेरिकेने युक्रेनवर युद्ध हरण्याची भीती दाखवून तेथील खनिज साठ्यांचा ताबा घेतला आहे. तसेच चीनलाही हवे आहे. 

ही खनिजे उद्याचे ऊर्जा स्त्रोत, शक्तींसाठी उपयुक्त आहेत. पाकिस्तानी सैन्याचे लष्करप्रमुख या खनिजांच्या क्षेत्रात अमेरिकेलाही भागीदार करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे चीन भडकला असून चिनी राष्ट्राध्यक्षांसह अन्य चिनी उच्च अधिकाऱ्यांचे दौरे रद्द करण्यात आले आहेत. पाकिस्तानी सैन्याला अमेरिकेशी संधान साधायचे असेल तर आधी त्यांनी आम्ही दिलेले अब्जावधी डॉलर्सचे कर्ज चुकते करावे, असे स्पष्टपणे चीनने म्हटले आहे. 

माजी पाकिस्तानी लष्करी अधिकारी आदिल रझा यांनी वरिष्ठ पत्रकार शाहीन सेहबाई यांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. खैबर पख्तुनख्वाची खनिजे अमेरिकेच्या हवाली केल्यास केवळ चीनचा नाराज होणार नाही तर या भागात आधीच हिंसाचार आहे, त्यात आणखी तो अस्थिर होईल. युरेनियम आणि कोबाल्ट काढण्यास तेथील स्थानिक गट पखर विरोध करतील. हे एक युद्धच असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. आधीच बलुचिस्तानातील खनिजे बाहेर काढण्यासाठी पाकिस्तानी सैन्य बलुच लोकांचा रक्तपात करत आहे. यामुळे आता त्या लोकांनीही पाकिस्तानी सैन्यावर हल्ले सुरु केले आहेत. बलुचिस्तानमधील ग्वादर बंदरात प्रवेश आणि बांधकाम करण्यासाठी चीन चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर बांधत आहे. चीनने यासाठी ६२ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. बलुचिस्तानातील हल्ले पाहता चीनला त्यांचा पैसा बुडत असल्याचे वाटत आहे, असेही रझा म्हणाले. 

Web Title: Pakistan Army's double game with China; Angry Jinping cancels visit after america entry in mining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.