शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

इराणवर प्रतिहल्ला करून पाकिस्तानी लष्करालाच फायदा झाला? एकाच दगडात दोन पक्षी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 13:37 IST

इराण हल्ल्याचा फायदा पाकिस्तानलाच जास्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानवरइराणने एअरस्ट्राईक करत पाकिस्तानी सैन्याची जगभरात नाचक्की केली होती. यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी इराणमधीलदहशतवादी अड्ड्यांवर मिसाईल हल्ले करत बदला घेतला आहे. या हल्ल्यांतून पाकिस्तानी लष्कराने एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. 

इराण हल्ल्याचा फायदा पाकिस्तानलाच जास्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तानातील दहशतवादी संघटना जैश अल अदलच्या मुख्यालयावर एअरस्ट्राईक केले होते. तर पाकिस्तानने बलुच दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले केले आहेत. पाकिस्तानी सैन्याला यातून फायदा होणार आहे. पहिला म्हणजे पाकिस्तानी जनतेचा सैन्याबद्दल असलेला राग शांत होणार आहे.

पाकिस्तानी लोक इराणच्या हल्ल्यामुळे नाराज झाले होते. तसेच आपल्या सैन्याच्या क्षमतेवर ते प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. पाकिस्तानी लष्कराला फक्त राजकारणात इंटरेस्ट आहे, असे लोक म्हणत होते. पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत. मात्र याआधी लष्कराने इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाविरोधात अनेक कारवाया केल्या आहेत. यामुळेही लोकांमध्ये राग आहे. 

लष्कराने पुन्हा एकदा नवाझ शरीफ यांना पाकिस्तानात आणले आहे. नवाझ शरीफ यांच्या पंतप्रधान होण्याच्या मार्गातील सर्व काटे एक एक करून काढले जात आहेत. यापैकीच एक सर्वात मोठा काटा असलेले इम्रान खान यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. इराणवर झालेल्या हवाई हल्ल्यामुळे पुन्हा एकदा लोकांना आपल्या बाजूने करण्यात लष्कराला यश येणार आहे. 

टॅग्स :IranइराणPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद