शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर पाकिस्तानचा एअर स्ट्राईक; दहशतवादी तळांना केलं लक्ष्य, १९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 08:11 IST

पाकिस्तानने अफगाणिस्तान सीमेजवळ दहशतवाद्यांच्या तळांवर एअर स्ट्राईक केला आहे.

पाकिस्ताननेअफगाणिस्तान सीमेजवळ दहशतवाद्यांच्या तळांवर एअर स्ट्राईक केला आहे. पाकिस्तानमधील अलीकडील आत्मघाती हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांना या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला. या एअर स्ट्राईकमध्ये १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

पाकिस्तानचे मंत्री अताउल्लाह तरार यांनी रविवारी सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर माहिती दिली की, सैन्याने 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (TTP) आणि त्यांच्या सहयोगी संघटनांच्या सात तळांवर गुप्त माहितीच्या आधारे निवडक ऑपरेशन्स केली आहेत. सीमावर्ती भागात इस्लामिक स्टेटशी संबंधित एका गटावरही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

मात्र हे हल्ले नेमके कोणत्या ठिकाणी करण्यात आले हे पाकिस्तानने स्पष्ट केलेलं नाही. सोशल मीडियावरील रिपोर्ट्सनुसार, हे हल्ले अफगाणिस्तानच्या हद्दीत झाले आहेत. या हल्ल्यानंतर अफगाण सरकारचे विधानही समोर आलं आहे. अफगाणिस्तान सरकारने म्हटलं आहे की, पाकिस्तानने एका मदरसावर हल्ला केला असून या हल्ल्यात १९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानने या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचं म्हटलं आहे.

'टोलो न्यूज'ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील बरमल जिल्ह्यात एका मदरसावर हल्ला केला. याशिवाय पाकिस्तानी लढाऊ विमानांनी नंगरहार प्रांतातील खोगयानी जिल्ह्यातही एअर स्ट्राईक केला. पक्तिकाच्या बरमल आणि अर्गुनसह नंगरहारमधील खोगयानी, बहसोद आणि गनी खेल जिल्ह्यांतही हल्ले करण्यात आले.

खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ११ जण आणि एका मुलाचा मृत्यू झाला होता. तसेच बन्नू जिल्ह्यात झालेल्या दुसऱ्या एका आत्मघाती हल्ल्यात लेफ्टनंट कर्नलसह दोन जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यांनंतर पाकिस्तानने ही कारवाई केली आहे. या हल्ल्यांमागे अफगाणिस्तानात बसलेल्या टीटीपी नेतृत्वाचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ही संघटना अफगाण तालिबानपेक्षा वेगळी असली, तरी ती त्यांची जवळची मानली जाते. टीटीपी पाकिस्तानवर हल्ले करण्यासाठी अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर करतं, असा आरोप पाकिस्तान दीर्घकाळापासून करत आहे. मात्र काबूल आणि टीटीपीने नेहमीच हे आरोप फेटाळून लावले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan Air Strike on Afghanistan Border Targets Terrorists, 19 Dead

Web Summary : Pakistan conducted air strikes on terrorist hideouts near the Afghan border, reportedly killing 19. The strikes targeted Tehrik-i-Taliban Pakistan (TTP) and ISIS-linked groups, allegedly responsible for recent attacks in Pakistan. Afghanistan claims a madrassa was hit, vowing retaliation.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तानterroristदहशतवादीTerrorismदहशतवाद