शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

Afghanistan: पंजशीर युद्धात पाकिस्तानची थेट उडी; हवाई दलाकडून जोरदार बॉम्बफेक सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 09:16 IST

Panjashir Taliban War: तालिबानच्या दाव्यानुसार त्यांनी पंजशीर घाटीवर ताबा मिळविला आहे. तर  रेझिस्टंस फ्रंटचा दावा आहे की अद्याप पंजशीरवर त्यांचाच ताबा आहे. तालिबानचे 1000 हून अधिक दहशतवादी पंजशीरमध्ये मारले गेले आहेत.

काबूल : अजिंक्य असलेला पंजशीर (Panjashir) तालिबानच्या (Taliban) ताब्यात येण्यासाठी अफगाणिस्तान (AFghanistan) ताब्यात घेण्यासाठी छुपी मदत करणाऱ्या पाकिस्तानने (Pakistan) आता थेट उघड उघड उडी घेतली आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाने लढाऊ विमाने आणि ड्रोनच्या साह्याने अफगाणिस्तानचे कार्यकारी राष्ट्राध्यक्ष अमरुल्‍ला सालेह यांच्या घरासह अन्य ठिकाणी बॉम्बफेक केली आहे. पंजशीरने शस्त्रसंधीचा प्रस्ताव दिला आहे, परंतू तो तालिबानने फेटाळल्याचे समजते आहे. (Pakistani Air Force drones bombing attack on Panjshir Valley)

Afghanistan: पंजशीरच्या अहमद मसूदला तगडा झटका; तालिबानच्या हल्ल्यात फहीम दश्ती ठार

अफगाणिस्तानचे सामंगन प्रांताचे माजी खासदार जिया अरियनजादो यांनी याची माहिती दिली आहे. दुसरीकडे तालिबान आणि पंजशीर लढवय्ये आपापले दावे करत आहेत. रविवारी एका हल्ल्यात पंजशीरच्या सिंहाचा मुलगा अहमद मसूद याचा महत्वाचा सहकारी या लढ्यात मारला गेला आहे. पंजशीरमध्ये तालिबानी दहशतवादी आणि विरोधी गट रेझिस्टंस फ्रंट यांच्यात जोरदार युद्ध सुरु आहे. एकेकाळी हा प्रांत रशियाच्या सैन्यालाही जिंकता आला नव्हता. रशियाच्या रणगाड्यांचे भग्नावषेश आजही तेथील रस्त्यांच्या कडेला त्या घणघोर युद्धाची साक्ष देतात. मात्र, आता परिस्थिती बदलल्याचे दिसत आहे.

पंजशीर लवकरात लवकर ताब्यात येण्यासाठी तालिबानच्या मदतीला आता पाकिस्तान आले आहे. हवाई हल्ल्यांनी तेथील नेत्यांच्या घरांवर हल्ले करायचे, कमांडरना ठार करायचे आणि पंजशीर योद्ध्यांचे खच्चीकरण करायचे असा डाव पाकिस्तानने आखला आहे. यासाठी गेल्या तीन-चार दिवसांपासून पाकिस्तानच्या आयएसआयचे प्रमुख काबुलमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांच्या या उपस्थितीमुळे काहीतरी वेगळे घडणार आसल्याचे कयास बांधले जात होते. आजच्या या हवाई हल्ल्यांमुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

सावधान! अफगाणिस्तानातील तालिबानच्या वाढत्या सामर्थ्यानं भारताला धोका; CIA च्या माजी अधिकाऱ्याचा दावा

तालिबानच्या दाव्यानुसार त्यांनी पंजशीर घाटीवर ताबा मिळविला आहे. तर  रेझिस्टंस फ्रंटचा दावा आहे की अद्याप पंजशीरवर त्यांचाच ताबा आहे. तालिबानचे 1000 हून अधिक दहशतवादी पंजशीरमध्ये मारले गेले आहेत. त्यातच हक्कानी नेटवर्क आणि तालिबानमध्ये सत्तेतील वाट्यावरून भांडणे सुरु असून एका बैठकीत गोळीबारही झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शनिवारी सत्तास्थापनेचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला आहे. 

पाकिस्तानकडून हवाई हल्ले सुरुअफगाणिस्तानच्या मिडीयानुसार पाकिस्तानी हेलिक़ॉप्टर आणि ड्रोन विमाने पंजशीरच्या घाटीमध्ये सातत्याने बॉम्बहल्ले करत आहेत. अमरुल्ला सालेह यांच्या घरावरही बॉम्बफेक करण्यात आली. यामुळे सालेह पंजशीरच्या डोंगररांगांमध्ये अज्ञात ठिकाणी लपले आहेत. 

टॅग्स :TalibanतालिबानPakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तान